Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा शाहरुख खान! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेश कामतचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, दाखवले सिक्स पॅक ॲब्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 11:40 IST

1 / 8
उमेश कामत हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमधून उमेशने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.
2 / 8
उमेशचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच उमेशने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
3 / 8
या फोटोंमध्ये त्याचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. उमेशने त्याचे जीममधील फोटो शेअर केले आहेत.
4 / 8
या फोटोंमध्ये उमेशचे सिक्स पॅक ॲब्स पाहायला मिळत आहेत. हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
5 / 8
प्रियासोबतचा एक फोटोही त्याने शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते दोघेही जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. 'प्रत्येक दिवशी हार्ड वर्क', असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
6 / 8
उमेशच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 'दर्द ए डिस्को', 'महाराष्ट्राचा शाहरुख खान' अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
7 / 8
काहींनी उमेश कामतला शाहीद कपूर आणि टायगर श्रॉफही म्हटलं आहे.
8 / 8
सध्या उमेश कामत जर तरची गोष्ट या नाटकाचे प्रयोग करत आहे. तर ताठ कणा हा त्याचा सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला होता.
टॅग्स :उमेश कामतमराठी अभिनेता