Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हो, मी लग्न करणार नाही" अभिनेता ललित प्रभाकरनं स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:54 IST

1 / 10
मराठी सिनेइंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय म्हणून ललित प्रभाकरकडे पाहिलं जातं. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून ललितने प्रेक्षकांना वेड लावलं.
2 / 10
ललित प्रभाकरच्या अनेक तरुणी चाहत्या आहेत. दिवसेंदिवस तो आणखी गुडलुकिंग आणि चार्मिंग दिसत आहे. ललित ३८ वर्षांचा झाला आहे. पण, अजून तो अविवाहित आहे.
3 / 10
अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ललितने आपण कधीच लग्न करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
4 / 10
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत ललितने लग्नसंस्थेवर आपले परखड मत मांडले. तो म्हणाला, 'मुळात मला लग्नसंस्थेपासूनच समस्या आहे. कोणीतरी मला 'तुम्ही आयुष्यभर एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबतच राहा' असं सांगितलेलं आवडत नाही'.
5 / 10
पुढे तो म्हणाला, 'वर्षानुवर्षे ज्या प्रथा चालत आल्या आहेत, त्या आपण पाळत आहोत, पण समाज म्हणून आपण अनेक चुकीच्या प्रथा बंदही केल्या आहेत.
6 / 10
रिलेशनशिपबद्दल बोलताना ललितने सांगितले की, तो कॉलेजमध्ये असताना काही नात्यांमध्ये होता, मात्र आता त्याला एकटे राहणे जास्त आवडते.
7 / 10
ललित म्हणाला, 'मी बराच काळ एकटा राहत असल्यामुळे मला स्वतःची सोबत खूप आवडते. मला एकांत प्रिय आहे'.
8 / 10
जेव्हा त्याला थेट विचारण्यात आले की, 'म्हणजे तू कधीच लग्न करणार नाहीयेस का?' तेव्हा त्याने ठामपणे 'हो, मी लग्न तर करणार नाहीये' असे उत्तर दिले.
9 / 10
ललित पुढे म्हणाला, 'मी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जवळपास प्रत्येक दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये माझं लग्न असतंच. लग्नातील सर्व विधी मी पडद्यावर इतक्या वेळा आणि इतक्या छान पद्धतीने केल्या आहेत की आता मला असं वाटतं की, हे सगळं खऱ्या आयुष्यात तर मी करणार नाही. मला कधी कधी तर माझं रिअल आयुष्य फिक्शन वाटतं आणि रील लाईफ रिअल वाटते'.
10 / 10
ललितच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो अलिकडेच 'वन टू चा चा चा' या विनोदी हिंदी सिनेमात झळकला होता. तसेच तो 'बिन लग्नाची गोष्ट' आणि 'आरपार' या मराठी चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
टॅग्स :ललित प्रभाकर