'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 16:40 IST
1 / 9'गाढवाचं लग्न' सिनेमा रिलीज होऊन बराच मोठा काळ उलटला आहे. तरीदेखील हा सिनेमा आणि त्यातील सावळा कुंभार आणि गंगीने रसिकांच्या मनात घर केले आहे. सावळा कुंभारची भूमिका अभिनेता मकरंद अनासपुरेंनी साकारली आहे. 2 / 9मकरंद अनासपुरे यांच्या खऱ्या आयुष्यातील गंगीला पाहिलंत का? त्या देखील एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.3 / 9मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीचं नाव शिल्पा अनासपुरे आहे. लग्नानंतर त्यांनी सिनेइंडस्ट्रीला रामराम केला.4 / 9मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचं लव्ह मॅरेज आहे. शिल्पा मुंबईतल्या असून त्यांनी नाटक आणि चित्रपटातून काम केले आहेत.5 / 9२००० साली 'जाऊ बाई जोरात' या नाटकात काम करत असताना शिल्पा आणि मकरंद यांची पहिली भेट झाली आणि याचकाळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या आणि त्यांनी लग्नाची मागणी घातली.6 / 9शिल्पा यांचा होकार मिळाल्यानंतर दोघांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितले. विशेष म्हणजे दोघांचे हे आंतरजातीय लग्न आहे. तसा दोघांच्या घरातून विरोध झाला नाही.7 / 9लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत चित्रपटात काम केले. एक दोन नव्हे तर तब्बल ५ चित्रपटात ते एकत्र झळकले आहेत. 8 / 9कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात त्या दोघांनी एकत्र काम केली आहेत.9 / 9मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर कार्यरत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्यात देखील शिल्पा यांचा मोलाचा वाटा आहे. मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.