जे बात..! गौतमी पाटीलचा पहिला मराठी चित्रपट थायलंडला होणार शूट, झळकणार या अभिनेत्यासोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 19:31 IST
1 / 12सध्या महाराष्ट्रातील तरूणांमध्ये गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) डान्सची तुफान चर्चा आहे. 2 / 12सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच फॉर्ममध्ये आलेली आहे. 3 / 12अनेक ठिकाणी तिला कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यात येऊ लागले आहे. मात्र आता गौतमीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.4 / 12लवकरच गौतमी मराठी चित्रपटातून नायिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 / 12घुंगरू हा तिचा पहिला वहिला मराठी चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे अर्धे शूटिंग जवळ जवळ पूर्ण झाले आहे.6 / 12गौतमी पाटीलच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचं शूटिंग हंपी, सोलापूर, माढा आणि परदेशात थायलंड येथे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे.7 / 12चित्रपटाची निर्मिती तसेच लेखन बाबा गायकवाड यांनी केले आहे.8 / 12या चित्रपटात गौतमी पाटील सोबत कोण झळकणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. 9 / 12यावरचा पडदा आता हटला असून चित्रपटाचे लेखक आणि निर्माते बाबा गायकवाड हेच मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 10 / 12बाबा गायकवाड यांनी कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतून काम केले होते. राजकारण आणि समाजकारणाची देखील त्यांना आवड आहे.11 / 12घुंगरू चित्रपटात शीतल गीते, सुदाम केंद्रे, ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण, वैभव गोरे हेही कलाकार झळकणार आहेत. 12 / 12कलावंताच्या जीवनावर भाष्य करणारा घुंगरू असणार आहे. कलावंतांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न बाबा गायकवाड यांनी केला आहे. चित्रपट निर्मितीसाठी तब्ब्ल दीड कोटींचा खर्च आला असेही सांगितले जात आहे.