Join us

Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 17:21 IST

1 / 14
अभिजीत खांडकेकरच्या नाशिकच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
2 / 14
केदार शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचे हे १६वे वर्ष आहे. त्यांनी बाप्पाचे फोटो शेअर करत लिहिले, यंदाचं आपल्या घरच्या गणपतीचे हे १६वे वर्षे. तुम्हा सगळ्यांवर बाप्पाची कृपादृष्टी राहो. सुख समृद्धी आपणास लाभो ही प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
3 / 14
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. ही बाप्पाची मूर्ती तिने स्वतःच्याच हाताने घडवली आहे.
4 / 14
देवमाणूस फेम किरण गायकवाड आणि त्याची पत्नी वैष्णवी कल्याणकर यांचा लग्नानंतर पहिल्यांदा गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यांनी त्यांच्या घरच्या बाप्पासोबतचा फोटो शेअर केला आहे.
5 / 14
मृण्मयी देशपांडेनेही तिच्या घरच्या बाप्पाची झलक चाहत्यांसाठी शेअर केली आहे.
6 / 14
आज वाजत गाजत आमच्या घरात… आले हो गणपती आले. म्हणत ज्ञानदा रामतीर्थकरने तिच्या घरच्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
7 / 14
सायली संजीवने तिच्या घरी पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे.
8 / 14
श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकरने सोशल मीडियावर घरच्या बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत.
9 / 14
अभिषेक देशमुख आणि कृतिका देवने त्यांच्या घरच्या बाप्पाची झलक दाखवली आणि लिहिले की, आगमन🌺 ह्या वेळेस बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीने घरी तयार केली आणि आनंद द्विगुणीत झाला..गणपती बाप्पा मोरया इको फ्रेंडली बाप्पा!!!
10 / 14
श्रेया बुगडेने घरच्या बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, आगमन २०२५ 🌺 पुन्हा एकदा तुझी सेवा करायची संधी दिलीयेस.....आता छान पाहुणचारचा आनंद घे..... मोदक ,लाडू खा...खूप लाड करून घे....आणि सगळ्यांना खूप आशीर्वाद आणि प्रेम दे, नेहेमी सारखं गणपती बाप्पा मोरया
11 / 14
प्रार्थना बेहरेने बाप्पाची झलक शेअर करत लिहिले, गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्तीच्या आगमनाने तुमचे घर आनंद, प्रेम आणि समाधानाने भरून जावो. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
12 / 14
रिंकू राजगुरूच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
13 / 14
अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरी हनुमानरुपी बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यांनी सजावट खूप छान केली आहे.
14 / 14
दरवर्षी प्रमाणे यंदाही अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीमृण्मयी देशपांडेस्वप्निल जोशीप्रार्थना बेहरेरिंकू राजगुरूसायली संजीवअभिज्ञा भावेअभिजीत खांडकेकरश्रेया बुगडे