Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिग्याची सुरेखा आठवतेय का? 'दुनियादारी'नंतर इंडस्ट्रीतून झाली गायब, आता काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:09 IST

1 / 9
२०१३ साली प्रदर्शित झालेला 'दुनियादारी' सिनेमा प्रचंड गाजला. आजही इतक्या वर्षांनंतर हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
2 / 9
या सिनेमातील डायलॉग आणि गाणीही प्रचंड हिट झाली होती. 'दुनियादारी'मधील कलाकारांच्या भूमिकाही गाजल्या होत्या.
3 / 9
'दुनियादारी'मध्ये अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, उर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार अशी स्टारकास्ट होती.
4 / 9
सिनेमातील दिग्या आणि सुरेखाच्या लव्हस्टोरी हिट झाली. पण, त्यांच्या लव्हस्टोरीच्या दी एण्डने चाहत्यांनाही वाईट वाटलं होतं.
5 / 9
पण, 'दुनियादारी'मध्ये सुरेखाची भूमिका कोणी साकारली होती? आणि दिग्याची सुरेखा आता काय करते? हे तुम्हाला माहितीये का?
6 / 9
'दुनियादारी'मध्ये दिग्याची भूमिका अंकुश चौधरीने तर त्याची गर्लफ्रेंड सुरेखाची भूमिका अभिनेत्री रिचा परियाली हिने साकारली होती.
7 / 9
या सिनेमाने रिचाला लोकप्रियता मिळवून दिली. मात्र या सिनेमानंतर ती कुठेच दिसली नाही. 'दुनियादारी'नंतर रिचा इंडस्ट्रीतून गायब झाली.
8 / 9
रिचा ही सोशल मीडियावरही सक्रिय नाही. २०१६ साली तिने रौनक शाहसोबत लग्न करत संसार थाटला. त्यामुळे आता ती संसारात रमली असल्याचं बोललं जातं.
9 / 9
'दुनियादारी' सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाल्यानंतर 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये दुनियादारीची टीम आली होती. तेव्हा अंकुशसोबत रिचाची झलक पाहायला मिळाली होती.
टॅग्स :अंकुश चौधरीसिनेमा