Join us

दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीला पाहिलंय का? मुलगा अन् सूनही आहेत कलाविश्वापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:56 IST

1 / 7
अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांची लोकप्रियता अफाट आहे. वयाच्या ८१ वर्षीही ते वेगवेगळ्या भूमिकेतून समोर येत आहेत.
2 / 7
कधी तात्या विंचू तर कधी टिपरे, चौकट राजा तर कधी नारबाची वाडी मधील नारबा अशा कित्येक भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लगे रहो मुन्नाभाई मध्ये त्यांनी साकारलेले गांधी तर प्रत्येकाच्या मनात आहेत.
3 / 7
दिलीप प्रभावळकर यांनी रंगभूमीपासून करिअरला सुरुवात केली होती. आजही ते नाटकात काम करतात. मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.
4 / 7
याव्यतिरिक्त ते लेखकही आहेत. 'बोक्या सातबंडे','अवती भवती','अनुदिनी', 'मी असा कसा झालो', 'अनपेक्षित' ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तसंच त्यांनी काही नाटकांचंही लेखन केलं आहे.
5 / 7
दिलीप प्रभावळकरांचं वैयक्तिक आयुष्य मात्र कायम खासगीच राहिलं. ते कुठेच आपल्या कुटुंबाविषयी फारसं बोललेले नाहीत. त्यांना एकुलता एक मुलगा आहे. कोण आहे त्यांची पत्नी आणि मुलगा वाचा
6 / 7
दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीचे नाव नीला प्रभावळकर आहे. १९७२ मध्ये त्यांनी लग्न केलं. नीला चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून लांबच राहणे पसंत करतात. त्यांचे फारसे फोटोही कधी सोशल मीडियावर आले नाहीत.
7 / 7
तर दिलीप आणि नीला यांना केदार हा एकुलता एक मुलगा आहे. तो इन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट सेंटरशी निगडित आहे. त्याच्या प्रमाणेच त्याची पत्नी सोनल अलवारदेखील याच क्षेत्रात कार्यरत आहे.
टॅग्स :दिलीप प्रभावळकर मराठी अभिनेता