Join us
Daily Top 2Weekly Top 5

संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेतील 'या' बालकलाकाराला ओळखलं का? आज आहे मराठीतला सुपरस्टार

By देवेंद्र जाधव | Updated: May 13, 2026 13:04 IST

1 / 7
संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेतील या बालकलाकाराला ओळखलं? आज हा बालकलाकार मराठीतला मोठा सुपरस्टार आहे. इतकंच नव्हे त्यांचा मुलगाही आज मराठी इंडस्ट्री गाजवत आहे
2 / 7
संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेतील हा बालकलाकार दुसरा तिसरा कोणी नसून ते आहेत महेश कोठारे. हो तुम्ही बरोबर वाचताय. महेश कोठारेंनी त्यांच्या बालपणी संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारली होती.
3 / 7
१९६४ साली आलेल्या संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटात महेश कोठारे यांनी संत ज्ञानेश्वरांची ही भूमिका साकारली होती. इतक्या कमी वयात ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत महेश कोठारेंनी छाप सोडली होती.
4 / 7
अस्खलित मराठी, संस्कृत श्लोकांचा स्वच्छ उच्चार आणि निरागस तरीही तेजस्वी डोळे अशा वैशिष्ट्यांनी युक्त असलेली महेश कोठारेंनी साकारलेली संत ज्ञानेश्वरांची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे.
5 / 7
आज महेश कोठारे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. महेश कोठारेंनी पुढे धुमधडाका, झपाटलेला, पछाडलेला, शुभमंगल सावधान यांसारख्या सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलं. याशिवाय विविध सिनेमांमध्ये अभिनयही केला.
6 / 7
महेश कोठारेंचा मुलगा आदिनाथ कोठारेही आज प्रसिद्ध अभिनेता आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. आदिनाथ सध्या मराठीसह हिंदी चित्रपटांतही काम करतोय. आगामी बहुचर्चित रामायण चित्रपटात झळकणार आहे.
7 / 7
एकूणच बालपणापासूनच महेश कोठारे अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत. आज स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर महेश कोठारेंनी मनोरंजन विश्वात एक आदराचं स्थान मिळवलं आहे.
टॅग्स :संत ज्ञानेश्वरमराठी चित्रपटमराठी अभिनेतामहेश कोठारे