Join us
Daily Top 2Weekly Top 5

'उगवली शुक्राची चांदणी'मधली सायली आठवतेय? अभिनयाला केला रामराम, आता काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:56 IST

1 / 8
'दे धक्का' हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक मानला जातो. या सिनेमात मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम अशी स्टारकास्ट होती.
2 / 8
या सिनेमातील भावा-बहिणीची जोडी प्रचंड गाजली होती. 'दे धक्का' सिनेमात अभिनेत्री गौरी वैद्यने सायलीची भूमिका साकारली होती.
3 / 8
गौरीने 'दे धक्का'बरोबरच 'शिक्षणाच्या आयचा घो' अशा मराठी सिनेमांमधून काम केलं. त्या सिनेमातील तिची भूमिकाही गाजली होती.
4 / 8
'दे धक्का'मधील 'उगवली शुक्राची चांदणी' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. त्यामधला सायलीचा डान्स आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
5 / 8
सायलीने दादाची गर्लफ्रेंड या नाटकातही काम केलं होतं. शिवाय ती एक उत्कृष्ट डान्सरही आहे.
6 / 8
मात्र करिअरच्या शिखरावर असतानाच तिने अभिनयातून ब्रेक घेतला. शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनय क्षेत्रापासून दूर गेली, अशी चर्चा होती. मात्र याविषयी कधीही तिने अधिकृतपणे सांगितलं नाही.
7 / 8
अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी गौरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
8 / 8
गौरी सध्या तिचं डान्स आणि करिअर यावर लक्ष केंद्रीत करत आहे. ती तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते.
टॅग्स :दे धक्का 2सेलिब्रिटी