उगवली शुक्राची चांदणी...! 'दे धक्का'मधली सायली कुठे आहे? आता कशी दिसते बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:38 IST
1 / 6२००८ साली आलेला 'दे धक्का' सिनेमा आजही सर्वांच्या लक्षात आहे. या सिनेमाने प्रेक्षकांना खूप हसवलं. मकरंद अनासपुरेंचं चौकोनी कुटुंब, त्यातल्या गंमती जमती, सिद्धार्थ जाधवची कॉमेडी सगळंच भन्नाट होतं.2 / 6सिनेमात सायली आणि किसना हे बालकलाकार होते. अभिनेत्री गौरी वैद्यने सायलीची भूमिका साकारली होती. सिनेमात ती नृत्य कलेत हुशार असलेली मुलगी होती. तिचं 'उगवली शुक्राची चांदणी' गाणं खूप गाजलं.3 / 6मकरंद अनासपरेंच्या मुलाच्या भूमिकेत दिसलेला सक्षम कुलकर्णी तर आजही सिनेमांमध्ये अॅक्टीव्ह आहे. तर सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी वैद्य आज कुठे आहे आणि कशी दिसते? 4 / 6गौरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असून तिला आता ओळखणंही कठीण झालंय. गौरी गेल्या अनेक वर्षात बरीच बदलली आहे5 / 6गौरीने माटुंग्यातील रुपारेल कॉलेजमधून इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतलं. गौरीने करिअरच्या शिखरावर असताना अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला.6 / 6गौरी अभिनयापासून दूर असली तरी ती अजून डान्स करिअर करते. तिची नृत्याची आवड आजही तशीच आहे आणि यातच तिने स्वत:ला व्यग्र केलं आहे.