Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकेकाळी गाजवला मोठा पडदा, आता राजकारणात! भाजपाकडून BMC निवडणूक लढवणारी निशा परुळेकर कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 09:20 IST

1 / 10
सध्या मुंबई आणि उपनगरासह संपूर्ण राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपाकडून काही उमेदवारांना मुंबई महापालिका निवडणुकीचा एबी फॉर्म देण्यात आला असून मराठी अभिनेत्रीही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
2 / 10
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकरला भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक २५ साठी निशाला भाजपाने उमेदवारी दिली आहे.
3 / 10
निशा परुळेकरने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून तिच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे योगेश भोईर-माधुरी भोईर उमेदवार आहेत.
4 / 10
निशा परुळेकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. अभिनय आणि सौंदर्याने निशाने एके काळी मोठा पडदा गाजवला.
5 / 10
'काळुबाई पावली नवसाला', 'अशी होती संत सखू', 'सासूच्या घरात जावयाची वरात', 'पोलीस लाईन', 'हरी ओम विठ्ठला', 'तीन बायका फजिती ऐका' हे तिचे गाजलेले सिनेमे.
6 / 10
अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. 'सही रे सही' या नाटकात तिने भरत जाधव यांच्यासोबतही काम केलं होतं.
7 / 10
याशिवाय सुख म्हणजे नक्की काय असतं, दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकांमध्ये ती दिसली होती.
8 / 10
निशाने साकारलेली महालक्ष्मी अंबाबाई ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
9 / 10
निशा गेल्या काही काळापासून राजकारणात सक्रिय आहे. सध्या ती भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या सहसंयोजक म्हणून कार्यरत आहे.
10 / 10
अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली निशा निवडणुकीत जिंकून त्यांच्या घरात स्थान मिळवू शकेल का हे पाहावं लागेल.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६टिव्ही कलाकार