1 / 4मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे.2 / 4आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या.3 / 4अश्विनी भावे सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करतात. पण त्यातही त्या खूप चांगल्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकतात. त्यांच्या ध्यानीमनी, मांजा या अलीकडे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.4 / 4अश्विनी भावे यांना आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्यांच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांचे त्यांच्या कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात.