Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशाताईंना आधीच लागलेली चाहूल? चार दिवसांपूर्वी सुधीर गाडगीळ यांच्याजवळ व्यक्त केलेली 'ही' इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:14 IST

1 / 7
भारतीय संगीतविश्वातील सदाबहार गायिका आशा भोसले यांचं काल (१२ एप्रिलला) निधन झालं. वयाच्या ९३ व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंचे अनेकांसोबत चांगले संबंध होते. त्यापैकी एक म्हणजे सुधीर गाडगीळ
2 / 7
सुधीर गाडगीळ यांनी आजवरच्या कारकीर्दीत आशा भोसलेंच्या अनेक मुलाखती घेतल्या. त्यामुळे आशा भोसले आणि सुधीर यांचे अगदी घरच्यासारखे संबंध होते. आशा भोसले यांच्या निधनाच्या ४ दिवसांपूर्वी सुधीर यांनी आशाताईंना फोन लावला होता. तेव्हा त्या दोघांचं शेवटचं संभाषण काय होतं? जाणून घ्या
3 / 7
सुधीर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ''४ दिवसांपूर्वी त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांना विचारलं काय म्हणताय?... तर त्या म्हणाल्या- काय म्हणणार, आता ९३ आलंय.. आता जायचं.''
4 / 7
''आता काय म्हणे भरभरुन बोलण्याचे दिवस आहेत का? वय ९३. आमच्याकडे याच्यापेक्षा जास्त आम्ही टिकतो असं नाही. जवळजवळ त्यांना कळलं होतं'', असं सुधीर गाडगीळ म्हणाले.
5 / 7
''आपल्या ज्या काही मुलाखती आहेत त्या तुझ्याकडे रेकॉर्ड केलेल्या आहेत ना. मग त्या मला एक-दोन दिवसांत ताबडतोब ऐकायला आणून देशील का? एक - दोन दिवसात का? आता प्रत्येक दिवसच मला महत्वाचा आहे'', अशा शब्दांत आशाताईंनी सुधीर गाडगीळांशी संवाद साधला.
6 / 7
अशाप्रकारे सुधीर गाडगीळांनी आशाताईंसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची आठवण जागवली. आशाताईंच्या अनेक मुलाखती सुधीर गाडगीळांनी घेतल्या. त्यामुळे पडद्यामागे त्यांच्यात मैत्री आणि आदर होता.
7 / 7
आशाताईंच्या जाण्याने संगीतक्षेत्राचं न भरुन येणारंं नुकसान झालंय. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.
टॅग्स :आशा भोसलेमराठी अभिनेतामराठी गाणी