1 / 10मनोरंजनासारख्या पुरुषांचं वर्चस्व असलेल्या क्षेत्रात मग ते बॉलिवूड असो, हॉलिवूड असो की आपली मराठी सिनेसृष्टीसगळीकडेच कायम स्त्रियांमध्ये अंतर्गत भांडणं होत असल्याचं एक ठराविक चित्र रंगवलं जातं. दोन हिरॉइन्मधली धुसफूस आणि त्यांच्यातली स्पर्धा असं सगळं गॉसिप नेहमीच चवीचवीनं चघळलं जातं.2 / 10मराठी सिनेसृष्टीतही अशाच चर्चा दोन ग्लॅमरस आणि आघाडीच्या अभिनेत्रींबाबत नेहमीच ऐकायला मिळाल्या; त्या म्हणजे 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी आणि 'चंद्रमुखी' अमृता खानविलकर.3 / 10सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर यांचं एकमेकींशी अजिबात पटत नाही, त्या एकमेकींना पाहाणंसुद्धा पसंत करत नाहीत, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण, या दोन्ही ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये खरंच असं वैर होतं का? यामागचं सत्य आता स्वतः या दोघींनी जाहीरपणे समोर आणलं आहे.4 / 10नुकत्याच झालेल्या 'फिल्मफेअर मराठी राउंड टेबल' (Filmfare Marathi Round Table) चर्चासत्रात प्रिया बापट, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या चौघींनी हजेरी लावली होती. याच मुलाखतीत सोनाली आणि अमृताने त्यांच्यातील वादाच्या चर्चांवर सडेतोड भाष्य केले.5 / 10सोनाली कुलकर्णीने अत्यंत प्रांजळपणे स्पष्ट केलं की, त्यांच्यात प्रत्यक्षात कधीच कोणताही वाद किंवा भांडण झालं नव्हतं.6 / 10सोनाली कुलकर्णी म्हणाली, 'इंडस्ट्रीत अमृता आणि माझ्यात वैर असल्याच्या चर्चा सर्वात जास्त रंगायच्या. पण आज मी स्पष्ट सांगते की, आमच्यात असं काहीच नव्हतं. विशेष म्हणजे, हा वाद कोणत्याही मीडियाने किंवा प्रसारमाध्यमांनी तयार केला नव्हता. उलट, आमच्या दोघींमधलं हे कथित वैर इंडस्ट्रीमधल्याच काही पुरुष अभिनेत्यांनी जाणीवपूर्वक तयार केलं होतं. आमच्यात प्रत्यक्षात कधीच भांडण किंवा वाद झाला नव्हता'.7 / 10अमृतानेही याला दुजोरा देत एक किस्सा शेअर केला की, 'एकदा मी आणि सोनाली एकत्र विमानप्रवास करत होतो आणि योगायोगाने आम्ही एकमेकींच्या शेजारी बसलो होतो. तेव्हा इंडस्ट्रीतील काही पुरुष कलाकारांनी आमचे एकत्र फोटो काढले. मी आता कोणाचं नाव घेणार नाही, पण तिथूनच या सगळ्या चर्चांना हवा देण्यात आली. आता पुढे काय होणार? या दोघी एकच रूम शेअर करणार का? एकाच मंचावर परफॉर्म करणार का? अशा चर्चा मुद्दाम घडवून आणल्या गेल्या आणि लोकांमध्ये विनाकारण उत्सुकता निर्माण केली गेली'.8 / 10सोनालीने पुढे स्पष्ट केले की, या वादाच्या चर्चांमागे 'नटरंग' हा चित्रपटही एक कारण होता. या चित्रपटात सोनालीचे 'अप्सरा आली' आणि अमृताचे 'वाजले की बारा' ही दोन्ही गाणी प्रचंड गाजली. तेव्हापासूनच त्यांच्यात स्पर्धा आणि वैर असल्याचे चित्र इंडस्ट्रीने उभे केले.9 / 10यापूर्वीही सोनालीने 'बस बाई बस' या कार्यक्रमात आमच्यात कोणतंही वैर नाही, असं स्पष्ट केलं होतं. मात्र, आता या दोघींनी एकत्र येत अभिनेत्रींमधील वाद हा अनेकदा केवळ इंडस्ट्रीतील लोकांकडूनच कसा रचला जातो, याची पोलखोल केली. 10 / 10दरम्यान, रवी जाधव दिग्दर्शित 'नटरंग' सिनेमा वगळल्यास इतर कोणत्याही सिनेमात अमृता-सोनाली एकत्र दिसल्या नाहीत, त्यामुळे आता भविष्यात या दोन अभिनेत्री एकत्र आल्या, तर प्रेक्षकांसाठी ती एक मनोरंजनाची 'मेजवानी' ठरणार यात शंका नाही.