Alka Kubal: दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या दोन्ही लेकी प्रसिद्धीझोतापासून दूर, एक पायलट तर दुसरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:51 IST
1 / 8'माहेरची साडी' सिनेमा म्हटलं की अलका कुबल (Alka Kubal) डोळ्यासमोर येतात. या सिनेमाने त्यांना ओळख दिली. आजही अलका कुबल इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्या'वजनदार' या नाटकाचे प्रयोग करत आहेत. 2 / 8अलका कुबल यांनी १९९२ साली सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. समीर आठल्ये यांनी हिंदी, मराठी सिनेमांसाठी काम केलं आहे. दोघंही याच क्षेत्रात कार्यरत आहेत. 3 / 8अलका कुबल आणि समीर आठल्ये यांना दोन मुली आहेत. ईशानी आणि कस्तुरी अशी त्यांची नावं आहेत. आईवडील सिनेइंडस्ट्रीत असताना दोन्ही लेकींनी मात्र करिअरची वेगळी वाट धरली.4 / 8ईशानी आठल्ये ही त्यांची मोठी लेक आहे. ईशानी पायलट आहे. २०१५ मध्येच तिला वैमानिकाचं लाईफटाईम लायसन्स मिळालं. 5 / 8ईशानीने दिल्लीच्या निशांत वालियासोबत २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघंही परदेशातच वास्तव्यास आहेत. 6 / 8अलका यांनी ईशानी पायलट असलेल्या विमानात प्रवास करतानाचाही फोटो काही महिन्यांपूर्वी शेअर केला होता. या फोटोला बरेच लाईक्स मिळाले होते. एका आईसाठी नक्कीच ही गौरवाची बाब होती.7 / 8अलका कुबल यांची धाकटी लेक कस्तुरी डॉक्टर आहे. तिने परदेशातून डर्मॅटॉलॉजिस्टचं शिक्षण घेतलं. कस्तुरी २६ वर्षांची आहे. 8 / 8अलका कुबल सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. कुटुंबासोबतचे फोटो त्या शेअर करत असतात. त्यांच्या दोन्ही लेकींचे अकाऊंट मात्र प्रायव्हेट आहेत. त्यामुळेच त्या दोघीही फारशा लाईमलाईटमध्ये येत नाहीत.