1 / 8ऐश्वर्या नारकर या आजही त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. रुपाची खाण असलेल्या ऐश्वर्या म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील सौंदर्यवतीच.2 / 8पण, अभिनेत्रीचं ऐश्वर्या नारकर हे खरं नाव नाही. लग्नानंतर त्यांनी नाव बदललं. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा त्यांनी केला. 3 / 8लग्नानंतर अविनाश नारकर यांनी ऐश्वर्या यांचं नाव बदललं होतं. मात्र हे नाव अविनाश यांनी नव्हे तर त्यांच्या बहिणीने त्यांना सांगितलं होतं. 4 / 8'माझ्या बहिणीला ऐश्वर्या राय आवडायची. त्यामुळे तिने मला सांगितलं होतं की ऐश्वर्या असं नाव ठेव', असं अविनाश नारकर म्हणाले. 5 / 8आत्तापर्यंत जे अस्तित्व होतं ते वेगळं होणारे, वेगळी ओळख मिळणारे याची सुरुवात नावापासूनच होऊ दे या उद्देशाने ऐश्वर्या यांनी लग्नानंतर नाव बदललं होतं. 6 / 8ऐश्वर्या यांचं मूळ नाव हे पल्लवी असं आहे. पल्लवी अठले असं त्यांचं लग्नापूर्वीचं नाव होतं. 7 / 8याच नावाने त्यांना सिनेसृष्टीत लोक ओळखत होते. ऐश्वर्या नारकर यांनी हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.8 / 8'या सुखांनो या', 'स्वामिनी', 'लेक माझी लाडकी', 'श्रीमंतघरची सून', 'ये प्यार ना होगा कम', 'घर की लक्ष्मी बेटियां' या हिंदी-मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.