Join us

सई ताम्हणकर कोल्हापूरातील 'या' कलाकाराला दरवर्षी बांधते राखी, रक्ताच्या नात्यापलीकडलं नातं

By देवेंद्र जाधव | Updated: August 9, 2025 16:33 IST

1 / 7
सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सई ताम्हणकरचा भाऊही मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहे हे फार कमी जणांना माहित असेल
2 / 7
सई ताम्हणकरच्या भावाचं नाव आहे सचिन सुरेश गुरव. आता गुरव आणि ताम्हणकर ही आडनावं असली तर भाऊ-बहीण कसे काय? असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे
3 / 7
तर मित्रांनो, सई आणि सचिन हे सख्खे भाऊ नाहीत. तर सई ताम्हणकर ही सचिनला भाऊ मानते. गेल्या अनेक वर्षांपासून सई आणि सचिन रक्षाबंधन साजरं करतात.
4 / 7
मीडिया रिपोर्टनुसार सई ताम्हणकर ही सांगलीची आणि सचिन गुरव हा कोल्हापूरचा आहे. गेल्या अनेक वर्षापासून सई-सचिन एकमेकांना बहीण - भाऊ मानत आहेत
5 / 7
सचिन सुरेश गुरव हा मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध डिझायनर आहे. मराठी-हिंदीमधील अनेक नाटक, सिनेमांच्या पोस्टरची डिझाईन सचिनने केली आहेत.
6 / 7
सईचे सचिनच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. दरवर्षी जसा वेळ मिळेल तसं न चुकता सई सचिनसोबत रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरा करते
7 / 7
सई-सचिन यांचा एकमेकांच्या करिअरमध्ये खूप सपोर्ट आहे. अशाप्रकारे सख्खे नसले तरीही रक्ताच्या नात्यपलीकडे या दोघांचं नातं आहे
टॅग्स :सई ताम्हणकररक्षाबंधनसांगलीकोल्हापूरमराठीमराठी अभिनेता