पुण्याची प्रसिद्ध शाळा अन् मुंबईचं कॉलेज! गिरीजा ओकचं शिक्षण माहीत आहे का? जाणून घ्या तिच्या शिक्षणाबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:12 IST
1 / 10अभिनेत्री गिरीजा ओक ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. 2 / 10मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक 'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्धीझोतात आली आहे. 3 / 10तिच्या लूकवर, हसण्यावर, बोलण्याच्या स्टाईलवर सगळेच भाळले आहेत. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते.4 / 10 ती तिच्या साडीतल्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर रातोरात नॅशनल क्रश झालीय.5 / 10गिरीजा ओकचा जन्म नागपूरचा असला तरी तिचे शिक्षण मुंबई आणि पुण्यात झालं आहे.6 / 10गिरीजा ओकने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा या शाळेतून पूर्ण केलंय.7 / 10गिरीजाने मुंबईतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.8 / 10ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर गिरीजाने बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. कॉलेजमधूनच अभिनयाला सुरूवात केली.9 / 10सुरूवातीला जाहिराती आणि थिएटर वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला होता.10 / 10हिंदी जाहिरात, सिनेमा आणि वेबसीरिजच्या माध्यमातून गिरीजाने रसिकांच्या मनावर छाप सोडली.