Join us

२५ वर्षांची ही मराठमोळी अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीत आहे लोकप्रिय, मराठी मालिकांमध्ये गाजल्या भूमिका

By देवेंद्र जाधव | Updated: February 18, 2025 19:05 IST

1 / 7
ही २५ वर्षांची मराठी अभिनेत्री आज तिच्या सुंदर अभिनयाने मराठी मालिका विश्वात लोकप्रिय झाली आहे. ही अभिनेत्री आहे विजया बाबर
2 / 7
विजय बाबरचं वय २५ वर्ष आहे. ती राहायला मुंबईत असून मराठी मालिका विश्वात गेल्या काही वर्षांपासून ती कार्यरत आहे
3 / 7
अलीकडेच विजयाची प्रमुख भूमिका असलेल्या बयो मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. विजयाने साकारलेली बयोची भूमिका चाहत्यांना आवडली.
4 / 7
विजयाने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षात मराठी मालिकाविश्वात तिच्या अभिनयाने दबदबा निर्माण करुन चाहत्यांचं प्रेम मिळवलंय. जय जय स्वामी समर्थ मालिकेत विजयाने साकारलेली चंदाची भूमिका चांगलीच गाजली.
5 / 7
विजयाचे सोशल मीडियावर ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विजया मॉडर्न, पारंपरिक अंदाजात फोटोशूट करताना दिसते.
6 / 7
सुंदर अभिनय, भूमिकेची समज अशा गुणांमुळे विजया बाबर अल्पावधीत सर्वांच्या पसंतीस उतरली.
7 / 7
विजया बाबर नुकतीच अंकिता वालावलकर आणि कुणाल भगतच्या लग्नाला गेली होती. तिथे विजयाने केलेला डान्स चांगलाच लोकप्रिय झाला.
टॅग्स :टेलिव्हिजनश्री स्वामी समर्थसोनी मराठी