1 / 8मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे.2 / 8तिच्या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.3 / 8सिल्व्हर थाई स्लिट ड्रेसमध्ये सईने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. हा पोशाख तिने खास महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासाठी केला आहे.4 / 8सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. फक्त तू आणि काही नाही, अशी एका चाहत्याची कमेंट लक्ष वेधून घेतेय.5 / 8फ्लॉवर नहीं फायर है तू, अशी कमेंट एका युजरने सईच्या सौंदर्यचं कौतुक केलं आहे. एकाने तर चक्क आय लव्ह यू सई म्हणत तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं आहे.6 / 8मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरची नवीन वेबसीरिज ‘पेट पुराण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 7 / 8 ‘पेट पुराण’ ही पाळीव प्राण्यांचे पालनपोषण करण्यावरील उत्साहवर्धक सोशल कॉमेडी सिरीज आहे.६ मे २०२२ रोजी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड व बंगाली या भाषांमध्ये सोनीलिव्हवर सुरू होणार आहे.8 / 8काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती. तिने फोटो शेअर करत लाइफ पार्टनरबद्दल सांगितले. सई ताम्हणकर हिने फोटो शेअर केलेल्या व्यक्तीचं नाव अनीश जोग आहे.