Join us

आईसारखंच आरस्पानी सौंदर्य, निशिगंधा वाड यांच्या लेकीला पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:57 IST

1 / 7
९०चं दशक गाजवलेल्या काही अभिनेत्रींमध्ये निशिगंधा वाड यांचं नावही घेतलं जातं. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.
2 / 7
अभिनयाबरोबरच चर्चा व्हायची ती निशिगंधा वाड यांच्या सौंदर्याची. आरस्पानी सौंदर्य असलेल्या निशिगंधा वाड यांची लेकही हुबेहुब त्यांच्यासारखीच दिसते.
3 / 7
निशिगंधा वाड यांनी अभिनेते दीपक देऊळकर यांच्याशी लग्न करत संसार थाटला. त्यांना ईश्वरी ही मुलगी आहे.
4 / 7
ईश्वरी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करते.
5 / 7
नुकतंच फादर्स डे निमित्ताने ईश्वरीने वडील दीपक देऊळकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली होती.
6 / 7
सुंदर निशिगंधा वाड आणि हँडसम दीपक देऊळकर यांची लेक ईश्वरी सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना टक्कर देते.
7 / 7
त्यांनी ईश्वरीच्या नावाने 'ईश्वरी व्हिजन' निर्मिती संस्था सुरू केली आहे. याच निर्मिती कंपनीतून त्यांनी 'श्री गुरुदेवदत्त' मालिकेची निर्मिती केली होती.
टॅग्स :निशिगंधा वाडसेलिब्रिटी