By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 16:53 IST
1 / 9'अशी ही बनवाबनवी' हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमातील सगळ्याच पात्रांनी चाहत्यांना वेड लावलं होतं. 2 / 9या सिनेमातील लिंबू कलरची साडी फारच लोकप्रिय झाली. या सिनेमात लिंबू कलरची साडी नेसणाऱ्या माधुरीची भूमिका अभिनेत्री अश्विनी भावेंनी साकारली होती. 3 / 9अश्विनी भावे या मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री. कित्येक सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. 4 / 9'अशी ही बनवाबनवी', 'शाब्बास सुनबाई', 'हळद रुसली कुंकू हसलं', 'घोळात घोळ', 'एक रात्र मंतरलेली', 'मायेची सावली', 'सरकारनामा', 'धडाकेबाज' हे त्यांचे गाजलेले सिनेमे. 5 / 9'कायदा कानून', 'परंपरा', 'जखमी दिल', 'वापसी साजन की', 'भैरवी', 'युगपुरुष' या हिंदी सिनेमांमध्येही अश्विनी भावे दिसल्या होत्या. 6 / 9करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांनी किशोर बोपार्डीकर यांच्याशी लग्न करत संसार थाटला. लग्नानंतर अश्विनी भावे या परदेशात स्थायिक झाल्या आहेत. 7 / 9परदेशातील व्हिडीओ अश्विनी भावे त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर करताना दिसतात. परदेशात राहत असल्या तरी अश्विनी या चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स देत असतात. 8 / 9वयाची पन्नाशी ओलांडली तरी अश्विनी भावे या अजूनही तशाच दिसतात. त्यांचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. 9 / 9परदेशात स्थायिक झालेल्या अश्विनी अजूनही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. अलिकडेच त्या 'गुलाबी' आणि 'घरत गणपती' या सिनेमांमध्ये दिसल्या होत्या.