Join us

दिलीप प्रभावळकर ते भरत जाधव! 'या' दिग्गज कलाकारांनी साकारल्या स्त्री भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 16:11 IST

1 / 10
मराठी कलाविश्वात असे असंख्य सेलिब्रिटी आहेत ज्यांनी उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. यात असेही काही अभिनेता आहेत ज्यांनी स्त्री भूमिका साकारुन आपल्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली. त्यामुळेच हे कलाकार कोणते ते पाहुयात.
2 / 10
प्रसाद ओक - मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. अभिनेता असण्यासोबतच प्रसाद दिग्दर्शक आणि गायकदेखील आहे. प्रसादने नांदी’ या नाटकात स्त्री भूमिका साकारली होती.
3 / 10
सुबोध भावे - बालगंधर्व यांनी साकारलेली स्त्री व्यक्तीरेखा विसरणं सध्याच्या घडीला कोणालाही शक्य नाही. विशेष म्हणजे त्यांची भूमिका साकारण्याचा प्रयत्न अनेक अभिनेत्यांनी केला. त्यातलंच एक नाव म्हणजे सुबोध भावे. या अभिनेत्याने साकारलेली ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली.
4 / 10
दिलीप प्रभावळकर - नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेता म्हणजे दिलीप प्रभावळकर. उत्तम अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांनी 'हसवा फसवी' या नाटकात स्त्री भूमिका साकारली होती. तसंच 'वासूची सासू'मध्येदेखील ती स्त्री भूमिकेत झळकले होते.
5 / 10
लक्ष्मीकांत बेर्डे - मराठी कलाविश्वातील सुपरस्टार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. या दिग्गज अभिनेत्याला विसरणं कोणालाही शक्य नाही. त्यातच बनवाबनवी या चित्रपटात त्याने साकारलेली पार्वती ही भूमिका तर प्रचंड लोकप्रिय झाली.
6 / 10
सचिन पिळगांवकर - लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच अशी ही बनवाबनवी या चित्रपटात सचिन पिळगांवकरनेही स्त्री भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांनी सुभा ही भूमिका वठवली होती.
7 / 10
विजय चव्हाण - ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणं म्हटलं की डोळ्यासमोर दिवंगत अभिनेता विजय चव्हाण यांनी साकारलेली 'मोरुची मावशी' उभी राहते. विजय चव्हाण यांची ही भूमिका आणि त्यात त्यांनी केलेला खास डान्स आजही लोकप्रिय आहे.
8 / 10
भरत जाधव - 'मोरुची मावशी' या नाटकात विजय चव्हाण यांच्यानंतर भरत जाधवने ही भूमिका साकारली होती. या नाटकाचं पुनरुज्जीवन केलं तेव्हा विजय चव्हाण यांनी भरत जाधवचं मार्गदर्शन केलं होतं.
9 / 10
सुयश टिळकने गेट टू गेदरमध्ये स्त्री भूमिका साकारली आहे
10 / 10
स्वप्नील जोशी - 'तेरे घर के सामने' या मालिकेत अभिनेता स्वप्नील जोशी स्त्री भूमिकेत झळकला होता.
टॅग्स :सेलिब्रिटीलक्ष्मीकांत बेर्डेसचिन पिळगांवकरविजय चव्हाणसुबोध भावे प्रसाद ओक