Join us  

नववधू प्रिया मी बावरते! सुबोध भावेच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 5:30 PM

1 / 9
नाटक, चित्रपट आणि मालिका अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. (Photos : subodh bhave facebook page)
2 / 9
आपल्या अभिनयाच्या जोरावर सुबोधने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यामुळे आज त्याचा तुफान मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
3 / 9
सुबोध त्याच्या करिअरसोबतच पर्सनल लाईफमुळेही तितकाच चर्चिला जातो. सुबोधची दोन्ही मुलं आणि पत्नी यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. म्हणूनच, आज आपण सुबोध आणि मंजिरी यांच्या लग्नाचा अल्बम पाहुयात.
4 / 9
१९९१ मध्ये सुबोध आणि मंजिरी यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे मंजिरीच्या एका होकारासाठी सुबोधला बरीच वाट पाहावी लागली असं म्हणतात.
5 / 9
सुबोध आणि मंजिरी शालेय दिवसांपासून एकाच नाट्य संस्थेत जात होते.
6 / 9
दहावीला असताना सुबोधने पहिल्यांदा मंजिरीला पाहिलं आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर काही काळ गेल्यावर सुबोधने मंजिरीला प्रपोज केलं.
7 / 9
सुबोधने प्रपोज केल्यावर मंजिरीनेही तितक्याच हटके अंदाजात त्याला उत्तर दिलं. एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितलं होतं.
8 / 9
'बालगंधर्वच्या पुलावर ठराविक वेळेला आले तर हो समज..', असं मंजिरी त्यावेळी सुबोधला म्हणाली. विशेष म्हणजे तिने सांगितल्याप्रमाणे ती त्याच वेळी पुलावर सुबोधला भेटायलाही गेली.
9 / 9
१९९१ मध्ये सुबोध आणि मंजिरीच्या सुरू झालेल्या प्रेमाच्या प्रवासाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोघांनी २००१ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.
टॅग्स :सुबोध भावे