अभिनय क्षेत्रात येणाऱ्या पूर्वी सागर कारंडे करायचा 'हे' काम; पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 14:33 IST
1 / 9'चला हवा येऊ द्या' या शोने लोकप्रियतेची एक उंची गाठली आहे. त्यामुळे त्यातील कलाकार कायम चर्चेत येत असतात.2 / 9सध्या सोशल मीडियावर अभिनेता, विनोदवीर सागर कारंडे याची चर्चा रंगली आहे.3 / 9आपल्या उत्तम विनोदशैलीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनं जिंकणारा सागर आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत आहे.4 / 9सागरने कलाविश्वात त्याचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. मात्र, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता.5 / 9कलाविश्वात येण्यापूर्वी सागरने बराच मोठा स्ट्रगल केला आहे.6 / 9सागरच्या पहिल्या कामाविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे. मात्र, फार मेहनत करत आज त्याने यश संपादन केलं आहे.7 / 9अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी सागर एका कंपनीत काम करत होता.8 / 9कंपनीत काम करण्यासोबतच तो लहानमोठ्या नाटकांमध्येही काम करायचा.9 / 9एकदा चर्चगेट येथे असलेल्या LIC च्या कार्यालयात त्याने एक छोटं नाटकं सादर केलं होतं. त्यासाठी त्याला १०१ रुपये मानधन मिळालं होतं. विशेष म्हणजे ही त्याची आयुष्यातील पहिली कमाई होती.