अभिनेत्री पूजा सावंत भक्तीमय वातावरणात दंग; कर्नाटकातील पुरातन मंदिराला दिली बहिणीसह भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 16:05 IST
1 / 6मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. 2 / 6आतापर्यंत अभिनयामुळे चर्चेत येणारी पूजा सध्या तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत येत आहे. सध्या अभिनेत्री पूजा सावंत परमेश्वराच्या भक्तीत रमलेली पाहायला मिळते आहे. 3 / 6लोकप्रियतेच्या बाबतीत या अभिनेत्रीची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. 4 / 6सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या पूजा सावंतने तिच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा ब्रेक घेतला आहे. पूजा सध्या बहिण रिचासह कर्नाटकच्या नंदी हिल्स येते गेली आहे. तेथील भोगो नंदेश्वरा या पुरातन मंदिराला अभिनेत्रीने भेट दिली आहे.5 / 6लाल राखाडी रंगाचा कुर्ता पायजमा तसेच त्यावर ऑक्साइड ज्वेलरी असा साधा पूजा सावंतचा साधा, सालस लूक चाहत्यांना प्रचंड आवडलाय. 6 / 6कर्नाटकमधील काही फोटो पूजा सावंतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पुरातन शैलीत कोरीव काम केलेल्या प्राचीन मंदिरामध्ये पूजा सावंत रमलेली दिसतेय.