Join us

सानूचा इंडो-वस्टर्न लूक! रिना मधुकरचं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 15:03 IST

1 / 10
सध्याच्या घडीला रिना मधुकर हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मन उडू उडू झालं या मालिकेच्या माध्यमातून रिना घराघरात पोहोचली.
2 / 10
मन उडू उडू झालं या मालिकेत रिना, सानूची भूमिका साकारत आहे. किंचितशी नकारात्मक छटा असलेल्या तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.
3 / 10
कलाविश्वाप्रमाणेच रिना सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असते.
4 / 10
काही दिवसांपूर्वीच रिनाने अंडरवॉटर फोटोशूट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
5 / 10
रिना कधी वेस्टर्न, तर कधी पारंपरिक गेटअपमध्ये फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने इंडो-वेस्टर्न लूक करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
6 / 10
पुण्यातून शिक्षण पूर्ण केलेल्या रिनाने लोकनृत्याचा अभ्यास केला आहे. त्यामुळे यापूर्वी तिने लोकनृत्याचे अनेक कार्यक्रम केले आहेत.
7 / 10
अशाच एका कार्यक्रमात तिची आणि दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची भेट झाली. तिचं नृत्य पाहून त्यांनी तिची 'अजिंठा' या चित्रपटातील कमला हे मध्यवर्ती पात्र साकारण्यासाठी निवड केली.
8 / 10
या चित्रपटाच्या आधी तिनं 'क्या मस्त है लाइफ' या टीव्ही शो मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती.
9 / 10
रिनाने आमिर खानच्या 'तलाश' या चित्रपटात आमिर खानच्या सहकाऱ्याची भूमिकाही साकारली आहे.
10 / 10
रिनाने 'एजंट राघव' या हिंदी मालिकेत फॉरेन्सिक डॉक्टर आरती मिस्त्रीची मध्यवर्ती भूमिकाही वठवली आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकार