मल्लिका शेरावतचं खरं नाव माहितीये का? २२ वर्षात दिले २ हिट सिनेमे, तरी इतकी आहे संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 14:30 IST
1 / 8'मर्डर' या गाजलेल्या सिनेमामुळे लक्षात राहिलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat). इम्रान हाश्मीसोबतच्या तिच्या इंटिमेट सीन्सची आजही चर्चा होते.2 / 8मल्लिकाला इंडस्ट्रीत तब्बल २२ वर्ष झाली आहेत. या कालावधीत तिने केवळ २ हिट सिनेमे दिलेत. मात्र तरी तिची कोट्यवधींची नेटवर्थ आहे.3 / 8मल्लिकाचं खरं नाव रीमा लांबा (Reema Lamba) आहे हे अनेकांना माहित नसेल. हरियाणातील एका छोट्या गावात ती लहानाची मोठी झाली. करिअरसाठी मुंबईत आल्यावर तिने मल्लिका असं ठेवलं.4 / 8२००२ साली मल्लिकाने 'जीना सिर्फ मेरे लिए' सिनेमात स्पेशल अपिअरन्स दिला. २००३ साली 'ख्वाहिश' सिनेमात मुख्य भूमिका साकारली. यातही तिचे बोल्ड सीन होते. 'मर्डर' आणि 'वेलकम' या सिनेमांमुळे तिला लोकप्रियता मिळाली.5 / 8इंडस्ट्रीत येण्याआधी तिने एअर हॉस्टेस म्हणूनही काम केले होते. १९९७ साली चिने पायलट करण सिंह गिलसोबत लग्न केलं. मात्र १ वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. 6 / 8मल्लिकाची भारत आणि परदेशातही संपत्ती आहे. मुंबईतील अंधेरीमध्ये तिचा फ्लॅट आहेच शिवाय लॉस एंजिलिसमध्ये तिचा मोठा मॅन्शन आहे. तिथले फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.7 / 8तिची एकूण संपत्ती १७२ कोटी रुपये आहे. अभिनयासोबतच ती बिझनेसवुमन आणि फिटनेस फ्रीक आहे. दर महिन्याला ती जवळपास २ कोटी कमावते. तिचा स्वत:चा मेकअप ब्रँड आहे. 8 / 8मल्लिकाकडे आलिशान गाड्यांचंही कलेक्शन आहे. ८ कोटींची Lamborghini Aventador SV आहे. ६.२५ कोटींची Roles Royce Dawn आहे. तसंच फेरारी ८१२ आहे ज्याची किंमत ५ कोटी आहे.