Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडचे स्टार्स छोट्या पडद्याद्वारे करतात बक्कळ कमाई, एका एपिसोडसाठी घेतात इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 18:19 IST

1 / 8
बॉलिवूड कलाकार आधी टीव्ही म्हटलं की दूर पळायचे. पण आता बडे बडे स्टार टीव्हीवर प्रमोशन करण्यापासून तर टीव्हीवरचे रिअ‍ॅलिटी शो जज करण्यापर्यंत सगळं काही करतात. अर्थात यासाठी रग्गड पैसाही घेतात... रिअ‍ॅलिटी शो जज करण्यासाठी ते कोट्यावधी रुपये मानधन म्हणून घेतात.
2 / 8
सलमान खानचा नंबर सगळ्यात वरचा. बिग बॉस म्हटलं की, भाईजान हे जणू समीकरण झालं आहे. ‘बिग बॉस’च्या 13 व्या सीझनसाठी त्याने म्हणे, प्रति एपिसोड 13 कोटी घेतले होते. हे खरं असेल तर या एका सीझनमधून त्याने 200 कोटी कमावले. 12 व्या सीझनसाठी त्याने म्हणे प्रत्येक एपिसोडसाठी 11 कोटी चार्ज केले होते. प्रत्येक नव्या सीझनसाठी सलमानची फी वेगवेगळी असते.
3 / 8
बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित ही ‘झलक दिखला जा’ या सारख्या अनेक डान्स रिअ‍ॅलिटी शोचे परीक्षण करते. रिपोर्टनुसार, या शोच्या 7 व्या सीझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी तिने 1 कोटी रूपये चार्ज केले होते.
4 / 8
शिल्पा शेट्टीही मागे नाही. नच बलिए, जरा नचके दिखा, झलक दिखला जा, सुपर डान्सर अशा अनेक शोमध्ये ती जज म्हणून दिसली आहे. रिपोर्टनुसार, सुपर डान्सरच्या पहिल्या सीझनसाठी तिने म्हणे 14 कोटी घेतले होते. शिल्पा सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज बनली आहे.
5 / 8
बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा अनेक टीव्ही शो जज केले. पण ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोसाठी ती खास ओळखली जाते. चर्चा खरी मानाल तर या शोच्या एका सीझनसाठी तिला 1 कोटी रुपये मिळाले होते.
6 / 8
श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिनेही ‘झलक दिखला जा 9’ हा शो जज केला होता. यासाठी तिने 9 कोटी रुपये घेतल्याचे कळते.
7 / 8
अभिनेता हृतिक रोशन टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘जस्ट डान्स’मध्ये दिसला होता. या शोमध्ये जज म्हणून येण्यासाठी त्याने प्रति एपिसोड 2 कोटी रुपये चार्ज केल्याचे म्हणतात.
8 / 8
बेबो अर्थात करीना कपूर खान सुद्धा मागे नाही. रिपोर्टनुसार, ‘डान्स इंडिया डान्स: बॅटल आॅफ द चॅम्पियन्स’ या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोसाठी तिला प्रति एपिसोड 3 कोटी रुपये फी देण्यात आली होती.
टॅग्स :टेलिव्हिजनसलमान खानमाधुरी दिक्षितकरिना कपूरशिल्पा शेट्टी