Join us

'कुछ कुछ होता है'मधली छोटी अंजली कुठे गायब झाली? आता दिसते इतकी हॉट की ओळखूही येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:45 IST

1 / 10
'कुछ कुछ होता है' हा ९०च्या दशकातील सुपरहिट सिनेमांपैकी एक आहे. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमातील लव्ह ट्रँगलची गोष्ट प्रचंड गाजली.
2 / 10
या सिनेमातील छोटी अंजली प्रेक्षकांना आवडली होती. ही भूमिका अभिनेत्री सना सय्यदने साकारली होती.
3 / 10
समर कॅम्पमध्ये मोठ्या अंजलीला ही छोटी अंजली भेटल्याचं सिनेमात दाखवलं होतं. पण, मजेशीर गोष्ट अशी आहे की अंजलीची भूमिका साकारणाऱ्या सनानेदेखील उन्हाळ्याच्या सुट्टीतच या सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं.
4 / 10
तब्बल २०० बालकलाकारांनी छोट्या अंजलीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिल्या होत्या. त्यातून सनाची निवड करण्यात आली होती.
5 / 10
'कुछ कुछ होता है' सिनेमा १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा सना १० वर्षांची होती.
6 / 10
सिनेमाला प्रदर्शित होऊन आता २६ वर्ष झाली आहेत. तर सना आता ३६ वर्षांची आहे.
7 / 10
'कुछ कुछ होता है' नंतर ती करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमात दिसली होती. पण, त्यानंतर मात्र ती कुठेच दिसली नाही.
8 / 10
सध्या सना परदेशात असते. अभिनय सोडून ती सध्या मॉडेलिंग करत आहे.
9 / 10
सना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचे इन्स्टाग्रामवर ८ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
10 / 10
सनामध्ये आता खूप बदल झाला आहे. तिला आता ओळखणंही कठीण झालंय. अनेकदा सना तिचे हॉट फोटो शेअर करताना दिसते.
टॅग्स :शाहरुख खानसेलिब्रिटी