By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:33 IST
1 / 8२००६ मध्ये आलेला हृतिक रोशनचा 'क्रिश' सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यातल्या जादूने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. तर या सिनेमातील छोटा हृतिकही प्रेक्षकांना भावला होता. 2 / 8या सिनेमात छोट्या हृतिकची भूमिका बालकलाकार मिकी धमेजानी याने साकारली होती. आता तो मोठा झाला आहे. 3 / 8मिकीने बालपणापासून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. घरवाली उपरवाली या मालिकेत तो दिसला होता. 4 / 8'क्रिश'शिवाय त्याने इश्क विश्क, इट प्रे लव्ह या सिनेमांमध्येही काम केलं होतं. मात्र त्यानंतर तो कुठेच दिसला नाही. 5 / 8प्रसिद्धी मिळूनही आणि चांगलं करिअर घडत असतानाच मिकीने बॉलिवूडला टाटा बाय बाय केलं. आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं.6 / 8मिकी आता डॉक्टर झाला आहे. त्याने MBBS पर्यंतचं शिक्षण घेतलं असून तो डोळ्यांचा डॉक्टर आहे. 7 / 8मिकी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतो. अनेक रील्स तो शेअर करत असतो. या रील्समधून तो चाहत्यांना डोळ्यांबाबत माहिती देत असतो. 8 / 8पण, मिकीचा चेहरा आता थोडा बदलला आहे. घाऱ्या डोळ्यांनी लक्ष वेधून घेणारा मिकी आता खूपच हँडसम दिसतो.