By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 10:49 IST
1 / 10कियारा अडवाणीचा नुकताच रिलीज झालेला सत्य प्रेम की कथा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला. यातील कार्तिक आर्यन आणि तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. कियारा आज ३१ जुलैला आपला ३१वा वाढदिवस साजरा करते. यानिमित्त जाणून घेऊया तिच्या संबंधी काही खास गोष्टी...2 / 10आज कियारा बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. कियाराने मुंबईत शिक्षण पूर्ण केलं आणि ती मॉडेलिंगच्या दुनियेत आली. यानंतर बॉलिवूडमध्ये तिची एन्ट्री झाली.3 / 10कियारा अडवाणीने २०१४ मध्ये 'पगली' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. पण तिला ओळख मिळाली ती 'एमएस धोनी' सिनेमातून. त्यानंतर ती कबीर सिंहमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.4 / 10कियाराचं खरं नाव आलिया आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असावं. बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याआधी कियाराने तिचं नाव बदललं. सलमान खानने तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.5 / 10कियाराच्या सलमान खानसोबतच्या कनेक्शनबाबत फार कमी लोकांना माहीत असेल. इतकेच नाही तर कियाराची मावशी शाहीन कधीकाळी सलमानची गर्लफ्रेन्ड होती.6 / 10इतकेच नाही तर कियारा अडवाणी ही दिवंगत अभिनेते अशोक कुमार आणि सईद जाफरी यांच्याशी कनेक्टेड आहे. याबाबतही तिने सांगितले होते की, माझे आजोबा सईद जाफरीचे भाऊ आहेत. आजोबांनी दोन लग्ने केली होती. माझी पहिली आजी ब्रिटीश होती.7 / 10आजोबा मुस्लिम होते तरी त्यांनी माझ्या आजीला घटस्फोट देऊन नंतर दुसरं लग्न केलं होतं. दुसऱ्या लग्नानंतर भारती गांगुली माझी दुसरी आजी झाली. भारती गांगुली या अशोक कुमार यांची मुलगी होती.8 / 10कियाराच्या नेटवर्थबद्दल सांगायचं तर तिच्याकडे 23 कोटींची प्रॉपर्टी आहे. रिपोर्टनुसार, तिच्या कमाईत दरवर्षी सुमारे 25 टक्क्यांची वाढ होत आहे.9 / 10तिच्या या अपार्टमेंटची किंमत 14 ते 15 कोटी रूपये आहे. तिच्याकडे मर्सिडीज बेंज E220D ही कार आहे. तिच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारही आहे.10 / 10याच वर्षाच्या सुरुवातील कियाराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली.