Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kiara Advani Birthday: सलमान खानची पहिली गर्लफ्रेन्ड होती कियाराची मावशी, अशोक कुमारांशीही आहे नातं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 15:25 IST

1 / 13
बॉलिवूड ब्युटी कियारा अडवाणीने इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आज तिचा स्वत: एका मोठा चाहतवर्ग आहे. भलेही तिने साऊथ सिनेमातून सुरूवात केली असेल, पण तिला बॉलिडूनेच जास्त ओळख दिली. 'कबीर सिंह' सारखा सुपरहिट सिनेमा तिच्या नावावर आहे.
2 / 13
तर येणाऱ्या काही मोठ्या सिनेमांमध्ये ती दिग्गजांसोबत दिसणार आहे. ती अक्षय कुमार सोबत 'लक्ष्मी बॉम्ब', 'इंदु की जवानी,' 'शेरशाह' आणि 'भूल भुलैया' मध्ये दिसणार आहे. आज या कियाराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
3 / 13
कियारा अडवाणीने २०१४ मध्ये 'पगली' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. पण तिला ओळख मिळाली ती 'एमएस धोनी' सिनेमातून. त्यानंतर ती कबीर सिंहमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
4 / 13
कियाराच्या सलमान खानसोबतच्या कनेक्शनबाबत फार कमी लोकांना माहीत असेल. इतकेच नाही तर कियाराची मावशी शाहीन कधीकाळी सलमानची गर्लफ्रेन्ड होती.
5 / 13
कियाराने तिच्या सलमान कनेक्शनबाबत एका मुलाखतीत सांगितलं की, माझी आई सलमान खान सरांना ओळखत होती. दोघेही बांद्रातील आहेत. ते माझ्या आईला नेहमीच सांगत होते की, एक दिवस मी स्टार होणार. माझी आई आणि सलमान बराच काळ मित्र होते. दोघे सोबत सायकलिंग करत होते.
6 / 13
कियाराने सांगितले होते की, तिच्या आईनेच सलमान सर आणि मावशी शाहीनची भेट करून दिली होती. खूप वर्षांआधी दोघांनी एकमेकांना डेटही केलं होतं. कदाचित ते दोघांचं पहिलं रिलेशनशिप होतं.
7 / 13
इतकेच नाही तर कियारा अडवाणी ही दिवंगत अभिनेते अशोक कुमार आणि सईद जाफरी यांच्याशी कनेक्टेड आहे. याबाबतही तिने सांगितले होते की, माझे आजोबा सईद जाफरीचे भाऊ आहेत. आजोबांनी दोन लग्ने केली होती. माझी पहिली आजी ब्रिटीश होती.
8 / 13
आजोबा मुस्लिम होते तरी त्यांनी माझ्या आजीला घटस्फोट देऊन नंतर दुसरं लग्न केलं होतं. दुसऱ्या लग्नानंतर भारती गांगुली माझी दुसरी आजी झाली. भारती गांगुली या अशोक कुमार यांची मुलगी होती.
9 / 13
कियाराने सांगितले की, तिची पहिली आजी वर्ल्ड टूरवर निघून गेली होती. १३ वर्षाची असताना माझ्या दुसऱ्या आजीने माझ्या आईला सांभाळलं होतं. काही वर्षांआधी आजोबांचं निधन झालं आणि माझी पहिली आजी भारतात परत आली. अशाप्रकारे आम्ही सगळे एका आनंदी परिवारात राहतो.
10 / 13
कियाराला जेव्हा विचारलं गेलं की, तिचं काही बॉलिवूड कनेक्शन आहे का? यावर तिने सांगितले होते की, लग्नाआधी तिचे पॅरेट्स ७ वर्षे एकमेकांना डेट करत होते. जुही चावला त्यांची मैत्रीण होती. कियाराने सांगितले होते की, जुही आंटीने मला तेव्हापासून पाहिलंय जेव्हापासून माझा जन्म झालाय. आम्ही होळी-दिवाळीला सोबत असायचो.
11 / 13
12 / 13
13 / 13
टॅग्स :कियारा अडवाणीबॉलिवूडसेलिब्रिटीसलमान खान