Join us  

Karwa Chauth 2022 Photos: नवविवाहित कतरिना कैफ पासून मौनी रॉयपर्यंत, अभिनेत्रींनी थाटामाटात साजरा केला करवा चौथ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 1:06 PM

1 / 14
बॉलिवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतच्या अभिनेत्रींनी करवा चौथचं व्रत मोठ्या मनोभावे साजरं केलं. नवविवाहित कतरिना कैफपासून मौनी रायनं करवा चौथ साजरा केला, पाहा फोटो....
2 / 14
कतरिना कैफने पहिल्यांदा करवा चौथचा सण साजरा केला. पारंपरिक लुकमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत होती. कतरिनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याचे काही फोटो शेअर केले आहेत.
3 / 14
एका फोटोमध्ये कतरिना पती विकी कौशल, सासरे श्याम कौशल व सासूबाई वीणा कौशलसोबत दिसत आहेत. या फॅमिली फोटोवर चाहते फिदा झाले आहेत.
4 / 14
अभिनेत्री मौनी रॉय हिने लग्नानंतर पहिल्यांदा करवा चौथ साजरा केला. यावेळी पती सूरज नांबियारने तिला असं प्रेमाने किस केलं. या फोटोमध्ये मौनी खास लूकमध्ये दिसत आहे.
5 / 14
अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं करवा चौथ हा सण साजरा केला. तिनं पती राज कुंद्रासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
6 / 14
नताशा दलालनं पती वरुण धवनसोबत करवा चौथ सण साजरा केला. वरुणनं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा आणि नताशाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे,
7 / 14
गायक राहुल वैद्यनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये राहुल आणि दिशा यांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.
8 / 14
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी करवा चौथ सण साजरा केला असून त्यांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
9 / 14
बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्करनं देखील करवा चौथ हा सण साजरा केला.
10 / 14
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता यांनी देखील करवा चौथ साजरा केला.
11 / 14
टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिनेही करवा चौथ साजरा केला. यावेळी पती गुरमीत व मुलीसोबतचा फोटो तिने शेअर केला आहे. देबिना लवकरच दुस-यांदा आई होणार आहे.
12 / 14
रवीना टंडन आणि नीलम या अभिनेत्रींनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही करवा चौथचा सण साजरा केला. दोघींनी यावेळचा एक फोटो शेअर केला आहे.
13 / 14
संजय कपूरची पत्नी महिप कपूर हिनेही करवा चौथचा सण साजरा केला. महिपने पतीसोबतचा एक सुंदर फोटो यानिमित्ताने शेअर केला आहे.
14 / 14
रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर हिनेही करवा चौथचा सण साजरा केला. यावेळा स्वत:चा एक फोटो तिने शेअर केला आहे.
टॅग्स :कतरिना कैफमौनी राॅयटिव्ही कलाकारबॉलिवूडशिल्पा शेट्टीरवीना टंडन