Kantara to Cat: ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'पासून ते 'कॅट'पर्यंत वेबसिरीज आणि चित्रपट होणार OTTवर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 17:04 IST
1 / 6या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेबसिरीज OTT वर रिलीज होणार आहेत. जाणून घेऊया कोणते सिनेमे आणि वेबसिरीज आहेत त्या. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर कन्नड चित्रपट 'कांतारा' चं हिंदी व्हर्जन OTT वर रिलीज होणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'कांतारा' कन्नड, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम व्हर्जन रिलीज झाले आहे. पण त्याचे हिंदी व्हर्जन 9 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.3 / 6Taapsee Pannu स्टारर चित्रपट 'ब्लर' 9 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर स्ट्रीम केला जाईल. हा एक हॉरर चित्रपट आहे. यात तापसी पन्नू एक अशा मुलीची भूमिका साकरतेय जी तिच्या जुळ्या बहिणीच्या हत्येचा शोध लावत असते. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6रणदीप हुड्डा स्टारर 'कॅट' ही वेबसिरीज ९ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर येणार आहे. ही वेब सिरीज पंजाबमधील ड्रग्जच्या अवैध व्यापारावर आधारित आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6सयामी खेर आणि पावेल गुलाटी स्टारर 'फाडू: एक लव्ह स्टोरी' 9 डिसेंबर रोजी सोनी लिववर प्रीमियर होईल. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6आयुष्मान खुरानाचा 'डॉक्टर जी' हा सिनेमा थिएटरनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटात आयुष्मान खुराना एका स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका साकारत आहे. 11 डिसेंबर रोजी Netflix वर स्ट्रीम होईल.