Join us  

कंगनाचा शो ‘लॉकअप’मध्ये राहण्यासाठी या स्टार्सना किती मिळतं मानधन? आकडा वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 2:06 PM

1 / 10
कंगना राणौतचा ‘लॉकअप’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहेत. अनेक लोकप्रिय टीव्ही स्टारपासून सोशल मीडिया इन्फ्लुएंसरपर्यंत अनेकजण या शोमध्ये सामील झाले आहेत. या लॉकअपमध्ये राहण्यासाठी या सर्वांनी किती फी घेतली माहितीये?
2 / 10
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंजली अरोरा ‘लॉकअप’मध्ये राहण्यासाठी दर आठवड्याला 3 ते 4 लाख रूपये चार्ज करतेय.
3 / 10
मुनव्वर फारूखी हे वादग्रस्त कॅरेक्टरही कंगनाच्या या शोमध्ये आहे. तो दर आठवड्याला 3 लाख रूपये घेत असल्याचं कळतंय.
4 / 10
बोल्डनेससाठी ओळखली जाणारी पूनम पांडे ही सुद्धा शोचा भाग आहे. यासाठी ती दर आठवड्याला 3 लाख रूपये घेत असल्याची माहिती आहे.
5 / 10
बबीता फोगाट हिला तर ओळखत असालच. ती सुद्धा या शोमध्ये गेली आहे आणि दर आठवड्याला 3 लाख रूपये चार्ज करतेय.
6 / 10
अभिनेत्री पायल रोहतगी ही सुद्धा दर आठवड्याला 3 लाख रूपये फी घेत असल्याची माहिती आहे.
7 / 10
टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री सारा खान ही दर आठवड्याला 2.5 ते 3 लाख रूपये फी घेत आहे.
8 / 10
टीव्ही अभिनेत्री निशा रावल ही प्रत्येक वीकसाठी 1.75 ते 2 लाख रूपये फी घेत असल्याचं कळतंय.
9 / 10
फॅशन डिझाईनर सायशा शिंदे प्रत्येक आठवड्यासाठी 1 लाख रूपये घेतेय.
10 / 10
टीव्ही अभिनेता आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक करणवीर बोहरा दर आठवड्यासाठी 2 लाख रूपये घेतोय.
टॅग्स :कंगना राणौतपूनम पांडेटेलिव्हिजनटिव्ही कलाकार