Join us

'जुगजुग जियो'नं पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 19:44 IST

1 / 5
धर्मा प्रॉडक्शनने शनिवारी सांगितले की त्यांच्या 'जुगजुग जियो' चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 9.28 कोटींची कमाई केली आहे.
2 / 5
राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता वरुण धवन, अनिल कपूर, अभिनेत्री कियारा अडवाणी आणि नीतू कपूर यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची माहिती करण जोहरच्या बॅनरच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे.
3 / 5
पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'जुगजुग जियो' जगभरात हिट आहे.
4 / 5
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.
5 / 5
'जुग जुग जियो'सोबत नीतू कपूर सात वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतली आहे. या चित्रपटात मनीष पॉल देखील आहेत आणि प्रसिद्ध YouTuber प्राजक्ता कोळीने 'जुग्जुग जिओ' द्वारे चित्रपटांच्या दुनियेत प्रवेश केला आहे.
टॅग्स :कियारा अडवाणीवरूण धवन