Join us

'या' अभिनेत्रीमुळे बराक आणि मिशेल ओबामाच्या संसारात मीठाचा खडा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:08 IST

1 / 11
अमेरिकेचे 44 वे माजी राष्ट्रपती बराक ओबामा (Barack Obama) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आताही ते वैयक्तीक आयुष्यामुळेही चर्चेत आले आहेत.
2 / 11
बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा (Michelle Obama) यांच्यात सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा आहे. बराक यांचं नाव एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे.
3 / 11
ती अभिनेत्री आहे जेनिफर ॲनिस्टन. बराक आणि जेनिफर यांच्यात अफेअर (Jennifer Aniston And Barack Obama Dating Rumours) सुरू असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.
4 / 11
इनटच मॅगझिनने 'द ट्रुथ अबाऊट जेन अँड बराक' नावाने एक आर्टिकल प्रसिद्ध केलं केलं होतं. तेव्हापासून या चर्चांनी जोर धरला आहे. या कथित प्रेमप्रकरणाच्या बातम्यांनी संपूर्ण अमेरिकेतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
5 / 11
माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे अंत्यसंस्कारला आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे शपथग्रहण सोहळ्यात बराक ओबामा हे एकटेच पोहचले होते. महत्त्वाच्या राजकीय कार्यक्रमांना मिशेल ओबामा यांच्यासोबत दिसल्या नाहीत, त्यानंतर या अफवांनी आणखी वेग पकडला.
6 / 11
तर दुसरीकडे जेनिफरने हे वृत्त फेटाळले आहे. गेल्यावर्षी जिमी किमेल शोमध्ये जेनिफेरला तिच्या अफेअरबद्दल विचारण्यात आलं होतं. यावेळी ती म्हणाली, 'मी बराक यांना फक्त एकदाच २००७ मध्ये 'हॉलिवुड गाला'त भेटले आहे. मी बराक ओबामा यांच्यापेक्षा मिशेल ओबामा यांना अधिक ओळखते'.
7 / 11
जेनिफर हिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झाल्यास २००० मध्ये हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटशी लग्न केलं होतं. पण, हे लग्न फक्त ५ वर्षे टिकले आणि २००५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
8 / 11
यानंतर २०१५ मध्ये ॲनिस्टनने जस्टिन थेरॉक्सशी लग्न केले, जो तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. मात्र २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
9 / 11
आजवरच्या सर्वात लोकप्रिय सिटकॉमपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'फ्रेंड्स'मध्ये जेनिफर हिनं रेचल हे पात्र साकारलं होतं. भारतातही फ्रेंड्स या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे.
10 / 11
जेनिफरचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. पीपल मॅगझिनने २०१६ या वर्षातील सर्वात सुंदर महिला म्हणून जेनिफरची निवड केली होती. पीपलच्या कव्हरपेजवर जेनिफर झळकली होती.
11 / 11
बराक ओबामा यांनी १९९२ मध्ये मिशेल ओबामा यांच्याशी विवाह केला होता. जेव्हा बराक यांना मिशेल यांच्यावर प्रेम जडले, तेव्हा ते २८ वर्षांचे होते आणि मिशेल २५ वर्षांच्या होत्या. तेथून त्यांचा जो प्रवास सुरू झाला तो आजवर अबाधित आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीहॉलिवूड