Kat Kristian IPL 2022 GT vs SRH : Splitsvillaची अभिनेत्री वानखेडे स्टेडियमवर आली; तिला पाहून प्रेक्षकांच्या काळजाची धडधड वाढली, Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 16:39 IST
1 / 11IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने बुधवारी वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध थरारक विजयाची नोंद केली. राहुल तेवातिया व राशिद खान यांची आतषबाजी हिट ठरली. सनरायझर्स हैदराबादने ठेवलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची अवस्था १४ षटकांत ५ बाद १४० झाली होती. 2 / 11उम्रान मलिकने ( Umran Malik) २५ धावांत ५ विकेट्स घेत गुजरातला हादरवून टाकले होते, परंतु राहुल तेवातिया व राशिद खान ( Rahul Tewatia and Rashid Khan) यांनी अशक्यप्राय विजय मिळवून दिला. 3 / 11तेवातिया २१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावांवर, तर राशिद खान ११ चेंडूंत ४ चौकारांसह ३१ धावांवर नाबाद राहिले. अखेरच्या षटकात विजयासाठी २३ धावा हव्या असताना या जोडीने २५ धावा कुटल्या.4 / 115 / 11क्रिकेटच्या मैदानावरील हा थरार पाहून चाहत्यांची धडधड वाढलेली असताना वानखेडे स्टेडियमवर Splitsvillaची अभिनेत्री कॅट क्रिस्टियन ( Kat Kristian) आणि अवंतिका शर्मा ( Avantika Sharma) यांच्या उपस्थितीने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. कॅमेरामनने क्रिकेटचा थरार सुरू असताना प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या या सुंदर अभिनेत्रींना कॅमेरात टिपले.6 / 117 / 11स्टेडियमच्या मोठ्या स्क्रिनवर व्हायरल झालेल्या या सुंदरी आहेत तरी कोण, याची उत्सुकता चाहत्यांना लागलीच होती. त्यानंतर या दोघी Splitsvill या कार्यक्रमातील अभिनेत्री असल्याचे समोर आले. 8 / 119 / 11कॅट व अवंतिका या अभिनयासह मॉडलिंगही करतात. इंस्टाग्रामवर अवंतिकाचे २.३८ लाख फॉलोअर्स आहेत, तर कॅटच्या फॉलोअर्सची संख्या ही ८ लाखांच्या वर आहे. 10 / 1111 / 11