By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 17:07 IST
1 / 9बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा अॅनिमल चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला असला तरी हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानापेक्षा जास्त लोकप्रियता तृप्ती डिमरीला मिळाली. 2 / 9अॅनिमलमध्ये भाभी २ नावाने तृप्ती डिमरी जास्त लोकप्रिय झाली. सध्या ती नॅशनल क्रश बनली आहे. 3 / 9अॅनिमलनंतर अभिनेत्रीकडे अनेक प्रोजेक्ट्सची रांग लागली आहे. सध्या ती आगामी प्रोजेक्ट्स आणि सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.4 / 9नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर ब्लेझरमधील फोटो शेअर केले आहेत. ब्लेझरच्या आत तिने काहीच घातलेले नाही.5 / 9या फोटोत ती क्लीवेज शोऑफ करताना दिसते आहे. तसेच तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. 6 / 9तृप्तीच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे. तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसतात. 7 / 9फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, तृप्ती डिमरी आता धर्मा प्रोडक्शन्सच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही फ्रेश जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 8 / 9तृप्ती डिमरी आगामी दिवसात विकी कौशल सोबत मेरे महबूब मेरे सनममध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दोघे रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. 9 / 9याशिवाय तृप्तीकडे विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ हा सिनेमा देखील आहे. यात ती राजकुमार रावसोबत झळकणार आहे.