By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 14:04 IST
1 / 7सध्या ऑस्कर २०२६ पुरस्कार सोहळ्याची चर्चा आहे. या पुरस्कार सोहळ्यात एक असा सिनेमा नॉमिनेटेड आहे त्याची खूप चर्चा आहे. 2 / 7या सिनेमाचं नाव आहे 'ट्रेन ड्रीम्स'. या सिनेमाची कहाणी अत्यंत भावनिक असून तुमच्या डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.3 / 7'ट्रेन ड्रीम्स' सिनेमात एका लाकूडतोड्याची गोष्ट दिसते. शहरात जे रेल्वे रुळ असतात त्याच्या आजूबाजूची झाडं कापण्याचं तो काम करत असतो. 4 / 7एका ठराविक कालावधीनंतर काम संपवून तो घरी येतो. त्याची बायको आणि चिमुकली लेक यांच्यासोबत तो सुखाने जीवन जगत असतो. परंतु काही दिवसांनी त्याला सर्वांचा निरोप घेऊन दूर एके ठिकाणी कामावर जावं लागतं.5 / 7काम सोडून आपण या जंगलात काहीतरी व्यवसाय करुन एकत्र राहू, अशी त्याची पत्नी त्याला विनवणी करते. रॉबर्टही तिचं म्हणणं मान्य करतो. 6 / 7एके दिवशी कामावरुन घरी येताना रॉबर्टला ट्रेनमधूनच सर्व जंगल जळालेलं दिसतं. रॉबर्टला प्रचंड धक्का बसतो. पेटलेल्या जंगलातून वाट काढत रॉबर्ट बायको-मुलीला शोधतो.7 / 7रॉबर्टला त्याची बायको-मुलगी सापडतात का? रॉबर्टच्या आयुष्यात शेवटी काय होतं? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला 'ट्रेन ड्रीम्स' हा सिनेमा पाहावा लागेल. यंदा ऑस्करच्या शर्यतीत असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहता येईल.