Join us

बारीक होण्यासाठी केलेली सर्जरी गायिकेच्या आली अंगाशी, ४२व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 19:20 IST

1 / 8
ब्राझिलियन गायिका डॅनी ली हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाल्यामुळे तिचे कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. असे सांगितले जात आहे की डॅनी लीने नुकतीच लिपोसक्शन सर्जरी केली होती, त्यानंतर तिची तब्येत बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.
2 / 8
सध्या मृत्यूचे खरे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
3 / 8
लिपोसक्शन शस्त्रक्रियेनंतर डॅनी ली तिच्या स्तनांचा आकार कमी करण्यासाठी शस्त्रक्रियाही करणार होती. पण लिपोसक्शननंतरच त्याला त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
4 / 8
'मेट्रो'च्या रिपोर्टनुसार, डॅनी लीच्या पतीला प्रचंड धक्का बसला आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे, तिचे वय सात वर्षे आहे.
5 / 8
डॅनी लीच्या कुटुंबीयांनीही इंस्टाग्रामवर एका निवेदनाद्वारे शोक व्यक्त केला आहे. तसेच डॅनी लीला श्रद्धांजली वाहणाऱ्या सर्व चाहत्यांसाठी एका समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
6 / 8
लिपोसक्शन सर्जरीमध्ये शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शरीरातील मुख्य अवयवातून अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते. हे मुळात लठ्ठपणा कमी करण्याचे तंत्र आहे. चेहरा, कंबर, छाती, मान आणि हनुवटी यासारख्या भागांवरील अतिरिक्त चरबी काढून टाकून स्लिम लुक दिला जातो.
7 / 8
डॅनी ली ब्राझीलमधील खूप प्रसिद्ध गायिका होती होते. तिला Eu sou da Amazonia म्हणजेच I’m from the Amazon मधून लोकप्रियता मिळाली. डॅनी लीने वयाच्या ५ व्या वर्षी गाणे सुरू केले.
8 / 8
गेल्या काही वर्षांत शस्त्रक्रियेनंतर झालेल्या गुंतागुंतांमुळे अनेक सेलिब्रिटींना जीव गमवावा लागला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये, अर्जेंटिनियन अभिनेत्री सिल्विना लुनाला कॉस्मेटिक सर्जरीनंतर आपला जीव गमावला लागला होता.