Join us

क्रूझवर Kiss करताना अभिनेत्रीचा प्रायव्हेट फोटो लीक! १३ वर्षांनी मोठ्या नेत्याला करतेय डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 14:07 IST

1 / 10
चित्रपटसृष्टी आणि राजकारण या दोन क्षेत्रांतील 'लव्ह कनेक्शन' काही नवीन नाही. अनेकदा राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रिटीज यांच्यात प्रेमाचे बंध जुळतात.
2 / 10
नुकतंच एक लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री आपल्यापेक्षा तब्बल १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या एका शक्तीशाली नेत्याच्या प्रेमात पडली आहे. या अफेअरची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगली आहे.
3 / 10
अभिनेत्री आणि नेत्यांचा क्रूझवर Kiss करतानाचा प्रायव्हेट फोटो लीक झाला आहे.
4 / 10
ज्या कपलची सध्या सर्वाधिक चर्चा आहे, ते आहेत कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि हॉलिवूडची लोकप्रिय पॉप स्टार केटी पेरी (Katy Perry).
5 / 10
या हाय-प्रोफाइल कपलचा (Justin Trudeau & Katy Perry Kissing Photo) एक अत्यंत रोमँटिक आणि प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत हे दोघे क्रूझवर एकमेकांना Kiss करताना दिसत आहेत. हा प्रायव्हेट फोटो लीक झाल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे.
6 / 10
जस्टिन ट्रूडो हे केटी पेरीपेक्षा १३ वर्षांनी मोठे आहेत. जस्टिन ट्रूडो हे ५३ वर्षांचे आहेत तर केटी पेरी ही ४० वर्षांची आहे.
7 / 10
विशेष म्हणजे कॅनडाचे हे माजी पंतप्रधान घटस्फोटित असून, तीन मुलांचे वडील आहेत. १८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर २०२३ मध्ये जस्टिन यांनी पत्नी सोफीपासून घटस्फोट घेतला होता.
8 / 10
घटस्फोटानंतर जस्टिन ट्रूडो पुन्हा प्रेमात पडलेत. मॉन्ट्रियलमधील एका रेस्टॉरंटमध्ये केटी आणि ट्रूडो एकत्र जेवत असल्याचे फोटो काही दिवासांआधी समोर आले होते.
9 / 10
केटीचं पहिलं लग्न ब्रिटिश विनोदवीर आणि अभिनेता रसेल ब्रँड याच्याशी ऑक्टोबर २०१० मध्ये झालं होतं. पण त्यांचा २०११ मध्ये घटस्फोट झाला.
10 / 10
यानंतर २०१६ मध्ये तिने अभिनेता ऑरलँडो ब्लूम याला डेट करायला सुरुवात केली आणि २०१९ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांना डेझी डोव्ह ब्लूम (Daisy Dove Bloom) नावाची मुलगी झाली. तथापि, अलीकडेच २०२५ मध्ये ते वेगळे झाले.
टॅग्स :कॅटी पेरीजस्टीन ट्रुडो