1 / 7प्रेम असावं तर असं! ५१ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्याने भारतीय गर्लफ्रेंडशी भारतीय पारंपरिक रितींनुसार लग्न केलं आहे. अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे2 / 7हा अभिनेता आहे रिक सेगल. रिकने त्याची भारतीय गर्लफ्रेंड इंद्राणी मुखर्जीसोबत लग्नगाठ बांधली. रिक आणि इंद्राणी मुखर्जी यांचं लग्न खास ठरलं3 / 7५६ वर्षीय रिक सेगल यांनी भारतीय परंपरेनुसार हे लग्न केलं. खास बंगाली पद्धतीत हे लग्न झालं असून चाहत्यांनी या लग्नाचं कौतुक केलं.4 / 7रिकने बंगाली पद्धतीचा कुरता आणि धोतर परिधान केलं होतं. याशिवाय इंद्राणीने लाल रंगाची सुंदर लाल साडी परिधान केली होती. दोघांची जोडी खूप खास दिसत होती.5 / 7रिक आणि इंद्राणी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. रिक गेली अनेक वर्ष भारतात राहत असून ते अनेक भारतीय कलाकारांच्या संपर्कात आहेत6 / 7रिक अमेरिकन अभिनेते असले तरीही गेल्या काही वर्षांपासून ते बॉलिवूडमधील काही इव्हेंटमध्ये आणि फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळत आहेत7 / 7रिक आणि इंद्राणीच्या लग्नाचे फोटो बघून अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. रिक आणि इंद्राणी यांच्या भावी आयुष्यासाठी सर्वांनी त्यांना सदिच्छा दिल्या.