1 / 12अँजोलिना जोली हे अनेक सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य करणारे नाव आहे. आज तिचा वाढदिवस.2 / 12 लुकिंग टू गेट आऊट या सिनेमातून अँजेलिनाने बालकलाकार म्हणून पहिल्यांदा सिनेमात काम केले. 3 / 12 ती एका वर्षाची असतानाच तिच्या आई-वडिलाचा घटस्फोट झाला होता. 4 / 12 तिच्या आई आणि भावाने तिचा सांभाळ केला होता. अँजेलिनाला सुरुवातीला अभिनयात अजिबातच रस नव्हता. ती मोठी होत होती तेव्हा आई सोबत सिनेमा पाहण्यासाठी जात असायची. यानंतर तिला सिनेमाचे हे विश्व आवडू लागले. 5 / 12 मॉडेलिंगला सुरुवात केली तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती.6 / 12अँजेलिनाने आजपर्यंत तीन लग्न केली आहेत. असे असले तरी ती एकटीच आपलं आयुष्य जगत आहे. 7 / 12अँजेलिना, जॉनी मिलरसोबत 28 मार्च 1996 मध्ये विवाहबद्ध झाली. हे तिचे पहिले लग्ऩ 1995 साली हॅकर सिनेमा आला होता. यावेळी शुटींगदरम्यान दोघे प्रेमात पडले़ दोघांनी लग्नही केले. परंतु 3 फ्रेब्रुवारी 1999 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले.8 / 12पहिला घटस्फोट झाल्यानंतर अँजेलिना अभिनेता बॉब थॉर्नटनसोबत विवाहबद्ध झाली. हे लग्न देखील जास्त काळ टिकले नाही. 2003 मध्ये अँजेलिना आणि बॉब दोघे वेगळे झाले.9 / 12यानंतर अँजेलिना आणि ब्रॅड पिट यांच्या अफेअरच्या चचेर्ला 2005 साली उधाण आले होते. अनेक वर्षे अँजेलिना आणि ब्रॅड लिव्हइनमध्ये राहिले. 10 / 12या दोघांना 6 मुलंही झालीत. अनेक वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर अखेर दोघे विवाहबद्ध झाले. हॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडी म्हणून या दोघांकडे पाहिले जात होते. परंतु हे दोघेही नंतर वेगळे झाले. सध्या अँजेलिना आपल्या मुलांसोबत रहाते.11 / 12सौंदर्य आणि अॅक्टिंग याशिवाय अँजेलिना तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली.12 / 12अँजेलिना आज सुपरस्टार आहे. पण एकाकी आयुष्य जगतेय.