Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तो मला साडीची पिन काढ म्हणाला...' हेमा मालिनी यांनाही आलाय कास्टिंग काऊचचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 15:17 IST

1 / 7
'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी (Hema Malini) यांना म्हणजे एव्हरग्रीन अभिनेत्री. त्यांचं सौंदर्य आजही तरुणींना कॉम्पेक्स देणारं आहे. शिवाय या वयातही त्या उत्तम कथ्थक करतात. ८० ते ९० च्या दशकात त्यांनी धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करत स्वत:ची वेगळी ओळख तयार केली.
2 / 7
सर्वजण त्यांचा कायम आदर करत आलेत. पण हेमा मालिनी यांनाही कास्टिंग काऊच सारख्या प्रकाराचा सामना करावा लागला आहे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला आहे. सुरुवातीच्या काळात त्या देखील कास्टिंग काऊच सारख्या प्रकाराला सामोऱ्या गेल्या आहेत.
3 / 7
एका फिल्ममेकरचा पर्दाफाश करताना हेमा मालिनी म्हणाल्या,'त्याला कोणता तरी एक सीन शूट करायचा होता. मी नेहमीच माझ्या साडीला पिन लावते. त्याने मला साडीची पिन काढायला सांगितली. मी म्हणलं साडी सुटेल. तर तो म्हणाला आम्हाला हेच हवंय.'
4 / 7
आजकालचे फिल्म निर्माता आपल्या कलाकाराला चांगलं दाखवण्यासाठी काहीच कष्ट घेत नाहीत. आजकाल फिल्मइंडस्ट्रीत काम करणं खूप आव्हानात्मक आहे. मला नाही वाटत मला परत काम करण्याची इच्छा होईल असंही त्या म्हणाल्या.
5 / 7
राज कपूर यांनी 'सत्यम शिवम सुंदरम' मध्येही काम करण्याची ऑफर हेमा मालिनी यांना दिली होती. मात्र अशा प्रकारचा सिनेमा करायचा नाही म्हणत त्यांनी ऑफर नाकारली होती.
6 / 7
राज कपूर हेमा मालिनी यांना भेटायला आले होते. त्यांनी सिनेमाबद्दल सांगितले. ते स्वत: असं म्हणाले की हा असा सिनेमा आहे जो तू करणार नाहीस पण माझी इच्छा आहे की तू करावा. तेव्हा हेमा मालिनी यांनी मान डोलावतच नकार दिला होता.
7 / 7
नुकतेच धर्मेंद्र यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुलींची माफी मागितली होती. कारण त्यांनी नातू करण देओलच्या लग्नात त्यांना आमंत्रित केलं नव्हतं.यामुळे देओल कुटुंब चर्चेत आलं होतं. आता हेमा मालिनी यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळेही सर्वांनाच धक्का बसलाय.
टॅग्स :हेमा मालिनीकास्टिंग काऊचबॉलिवूड