अशोक सराफ यांच्या एकुलता एक मुलाला पाहिलंत का?, सिनेइंडस्ट्रीत नव्हे तर या क्षेत्रात बनवले करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 17:04 IST
1 / 7मराठी कलाविश्वातील सुपरस्टार अशोक सराफ गेल्या चार दशकांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी-सराफ यादेखील एक अभिनेत्री असून त्यांनीही मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही हे दोघे या क्षेत्रात कार्यरत आहेत.2 / 7पण त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत सराफ एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अनिकेत सराफ एक शेफ आहे. त्याला जेवण बनवण्यात रस आहे. 3 / 7बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्यालादेखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. म्हणून त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले. 4 / 7अनिकेतचे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाले आहे. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबवर 'निक सराफ' या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत. 5 / 7करिअर म्हणून अनिकेतने परदेशात शेफ म्हणून नोकरी केली होती. पण आता अनिकेतने एका वेगळ्याच प्रवासाला सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे. 6 / 7काही दिवसांपूर्वी अनिकेत लंडनमध्ये गेला होता. दक्षिण युक्रेनमध्ये असलेल्या ऑक्सफेर्ड इंग्लिश सेंटर येथे त्याने एक मुलाखत दिली. इंग्लिश या सेकंड लँग्वेजसाठी त्याची टीचर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नुकताच त्याने हा जॉब स्वीकारला असून आता अनिकेत शिक्षक म्हणून एक वेगळी ओळख बनवत आहे. 7 / 7अनिकेत उर्फ निक सराफ हा गेली अनेक वर्षे परदेशातच वास्तव्यास आहे. परदेशात राहून त्याने काही नाटकांचे लेखन केले होते. याशिवाय नाटकातून त्याने काही भूमिका देखील साकारल्या होत्या. अनिकेतला कविता लिहिण्याची देखील आवड आहे.