Join us
Daily Top 2Weekly Top 5

आई मराठी, वडील पंजाबी; बॉलिवूडमध्ये डेब्यूआधी कॉफी शॉपमध्ये काम करायची ही चुलबुली गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 09:21 IST

1 / 9
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काहींना यश मिळालं तर काही आजही संघर्ष करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 9
आम्ही बॉलिवूडच्या आज अशा एका अभिनेत्रीबाबत बोलत आहोत जिने स्टारकिड म्हणून इंडस्ट्रीत डेब्यू केला खरा पण आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण देखील केलं. तिचं वडील पंजाबी तर आई कोल्हापूरची आहे. तुम्ही ओळखलंत तिचं नाव.(फोटो इन्स्टाग्राम)
3 / 9
नसेल ओळखलं तर आम्ही सांगतो ही अभिनेत्री आहे शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची लेक श्रद्धा कपूर.(फोटो इन्स्टाग्राम)
4 / 9
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आज प्रत्येक तरुणाची आवडती अभिनेत्री बनली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आज ही अभिनेत्री आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीबद्दल माहिती नसलेल्या काही गोष्टी आपण जाणून घेऊया.(फोटो इन्स्टाग्राम)
5 / 9
श्रद्धा कपूर चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी एका कॉफी शॉपमध्ये काम करत होती. वाटलं ना आश्चर्य? हे खरं आहे.एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने हा मोठा खुलासा केला होता.(फोटो इन्स्टाग्राम)
6 / 9
अभिनेत्री शिक्षणासाठी बोस्टनला होती तेव्हा त्याठिकाणी एका कॉफी शॉपमध्ये काम करत होती. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 9
याबद्दल सांगताना श्रद्धा म्हणते की, 'जबाबदारी ची जाणीव व्हावी, स्वतः च्या पायावर उभं राहावं आणि स्वतः च्या खर्चासाठी जास्तीचे पैसे मिळावे म्हणून मी काम करण्याचा निर्णय घेतला होता'.(फोटो इन्स्टाग्राम)
8 / 9
श्रद्धाच्या 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
9 / 9
लवकरच तिचा रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मै मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) हा सिनेमा रिलीज होणार आहे.
टॅग्स :श्रद्धा कपूरशक्ती कपूर