Join us  

'डिझायनर साधे कपडे द्यायचे नाहीत'; बॉलिवूडमध्ये झाला हंसिका मोटवानीसोबत भेदभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 12:44 PM

1 / 8
दाक्षिणात्य कलाविश्वासह बॉलिवूडमध्येही आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हंसिका मोटवानी.
2 / 8
बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या हंसिकाने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
3 / 8
हंसिकाचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगते. मात्र, तरीदेखील तिला बॉलिवूडमध्ये भेदभावाला सामोरं जावं लागलं.
4 / 8
अलिकडेच हंसिकाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने बॉलिवूडमध्ये तिला कशाप्रकारे वागणूक दिली याविषयी भाष्य केलं.
5 / 8
गेल्या अनेक वर्षात कलाविश्वात मोठे बदल झाले आहेत. मात्र, एक काळ असा होता जेव्हा डिझायनर त्यांचे कपडेही आम्हाला वापरायला देत नव्हते.
6 / 8
असे अनेक डिझायनर आहेत जे दाक्षिणात्य कलाकारांना कपडे द्यायला नकार द्यायचे. आम्ही आमचे कपडे देणार नाही, असं ते थेट सांगायचे. पण, आज तेच डिझायनर स्वत:हून माझ्याकडे येतात आणि आमचे कपडे ट्राय करा सांगतात, असं हंसिका म्हणाली.
7 / 8
पुढे ती म्हणते, तुमचा कार्यक्रम आहे, किंवा सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आहे तर आमचे कपडे घाला, असं ते सांगतात. मी सुद्धा जुनं विसरुन त्यांना होकार देते. कारण, जर मी त्यांच्यासारखंच वागत राहिले तर त्यांच्यात आणि माझ्यात फरक राहणार नाही.
8 / 8
दरम्यान, पूर्वी घडून गेलेल्या गोष्टींचा माझ्या मनात राग नाही, असंही तिने आवर्जुन सांगितलं.
टॅग्स :हंसिका मोटवानीसेलिब्रिटीटेलिव्हिजन