Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत आणि पाकिस्तानमधील कोरोना रुग्णाची तुलना केली असता हंसल मेहताला युझरने पाठवले कराचीचे तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 17:16 IST

1 / 4
निर्माते हंसल मेहता सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांनी नुकतीच भारत आणि पाकिस्तानमधील कोरोना स्थितीची तुलना सोशल मीडियावर केली होती. (फोटो: ट्विटर)
2 / 4
निर्माते हंसल मेहता यांना यावरून सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहेत. तुम्ही पाकिस्तानला कायम जात असाल तर मी तुम्हाला तिकीट काढून देतो असे एका युझरने त्यांना सुनावले आहे. (फोटो: ट्विटर)
3 / 4
हंसल मेहता यांनी यावर तिकीट पाठव... पाहिजे तर मी माझे बँक डिटेल्स देतो असे उत्तर दिले. त्यावर या युझरने रिप्लाय केला की, मी तिकीट पाठवतो. पण तुम्ही परत आलात... तर तुम्हाला तिकिटाच्या किमतीच्या दहा पट अधिक पैसे मला परत करावे लागतील. (फोटो: ट्विटर)
4 / 4
त्यावर युझरने मुंबई ते दुबई, दुबई ते कराची असे बुकिंग करत त्याचा स्क्रीन शॉर्ट सोशल मीडियावर शेअर केला. (फोटो: ट्विटर)
टॅग्स :हंसल मेहता